Next
ताराबाई मोडक, के. ना. वाटवे, प्र. वि. सोवनी
BOI
Thursday, April 19, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘विधवा स्त्रिया आणि कुंकू’ या विषयावरच्या चर्चेत ‘महिलांनी कुंकू लावणं म्हणजे गुलामगिरीचा उत्सव आहे’ असं परखड मत १९३५ साली मांडणाऱ्या भारताच्या पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक, साहित्य विमर्शकार म्हणून गाजलेले के. ना. वाटवे आणि विज्ञानलेखक प्र. वि. सोवनी यांचा १९ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’ मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......
ताराबाई कृष्णाजी मोडक

१९ एप्रिल १८९२ रोजी मुंबईत जन्मलेल्या ताराबाई मोडक या भारताच्या पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ म्हणून विख्यात आहेत. १९२६ साली भावनगरमध्ये असताना त्यांनी नूतन बालशिक्षण संघाचं ‘शिक्षापत्रिका’ हे मासिक चालवलं होतं. बधेका यांची बालमंदिर ही संकल्पना पाहून त्यांनी आपली सरकारी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ बालमंदिरासाठी वाहून घेतलं. तिथे प्रसिद्ध होणाऱ्या गुजराती भाषेतील ‘शिक्षणपत्रिका’ या मासिकातून त्यांनी लिखाण केलं होतं आणि त्यासाठी त्या गुजराती भाषाही शिकल्या होत्या.

त्या काळी जगभर प्रसिद्ध होत असलेल्या माँटेसरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून आणि त्यात भारतीय संदर्भानुसार योग्य बदल करून त्यांनी बालशिक्षणात भारतीय नृत्यप्रकार, कलाप्रकार, लोकगीतं आणि अभिजात संगीत यांचाही समावेश केला. लहान मुलांना शिक्षण हे कठीण, कटकटीचं, त्रासदायक न वाटता सोपं, मनोरंजक आणि हवंहवंसं वाटावं यासाठी त्यांनी आयुष्यभर मेहनत घेतली. पुढे त्यांनी प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर अनेक वर्षं काम केलं. 

१९३६ साली त्यांनी दादरला ‘शिशुविहार’ ही संस्था स्थापन केली. हे महाराष्ट्रातलं पहिलं आदर्श बालमंदिर मानलं जातं. आयुष्याची शेवटची सुमारे २५ वर्षं त्यांनी ठाणे जिह्यात कोसबाड या ठिकाणी आदिवासींमध्ये ग्रामशिक्षा केंद्रामध्ये काढली. आदिवासी मुलांसाठी कुरणशाळा, रात्रीची शाळा, व्यवसाय शिक्षण हे पूरक प्रकार प्राथमिक स्वरूपात त्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते. 

१९३५ मध्ये ‘स्त्री’ मासिकात रंगलेल्या ‘विधवा स्त्रिया आणि कुंकू’  या विषयावरच्या चर्चेत त्यांनी पत्र पाठवून महिलांनी कुंकू लावण्याच्या पद्धतीलाच जोरदार आक्षेप घेतला होता. ‘कुंकू लावणं म्हणजे गुलामगिरीचा उत्सव आहे’ असं त्यांचं मत होतं. 

१९६२ साली त्यांना शासनाने पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. 

३१ ऑगस्ट १९७३ रोजी त्यांचं निधन झालं.

(ताराबाई मोडक यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
......
केशव नारायण वाटवे 

१९ एप्रिल १८९५ रोजी जन्मलेले केशव नारायण वाटवे हे साहित्य विमर्शकार आणि समीक्षक होते. 

साहित्य-रसविमर्श, संस्कृत काव्याचे पंचप्राण, संस्कृत नाट्यसौंदर्य, संस्कृत साहित्यातील विनोद, नल दमयंती कथा, माझी वाटचाल, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

नऊ मे १९८१ रोजी त्यांचं निधन झालं.
.......

प्रभाकर विष्णू सोवनी 

१९ एप्रिल १९२६ रोजी जन्मलेले प्रभाकर विष्णू सोवनी हे भूशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक म्हणून प्रसिद्ध होते. 

ओळख भूशास्त्राची, विश्वाचा पसारा, आकाशातून अवकाशात, ओळख नक्षत्रांची, नवलाईचे दिवस, कूळकथा, व्यावहारिक विज्ञान, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

२० नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link