Next
भारतातील पहिल्या इंटरनेट कारचे अनावरण
‘एमजी हेक्टर’मधील अत्याधुनिक कार तंत्रज्ञान केले प्रदर्शित
प्रेस रिलीज
Wednesday, April 03, 2019 | 04:20 PM
15 0 0
Share this article:मुंबई : प्रसिद्ध ब्रिटिश कार निर्माता एमजी मोटरने (मॉरिस गॅरेज) आयस्मार्ट नेक्स्ट जेनचे सादरीकरण केले. आयस्मार्ट नेक्स्ट जेन वैश्विक टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या भागीदारीतून विकसित करण्यात आली आहे. कनेक्टेड मोबिलिटीचे मूर्त स्वरूप असणारी आयस्मार्ट नेक्स्ट जेनने सुसज्ज ‘एमजी हेक्टर’ ही भारतातील पहिली इंटरनेट कार असेल.

मायक्रोसॉफ्ट, अॅडोब, अनलिमिट, एसएपी, सिस्को, गाना, टॉम टॉम आणि न्यूआन्स यांसह इतर वैश्विक टेक भागीदारांच्या सशक्त संघटनेसह या कार निर्मात्या कंपनीने इंटरनेट-सक्षम कारची अनेक नवीन वैशिष्ट्ये प्रस्तुत केली, जी एमजी हेक्टरमध्ये उपलब्ध असतील. ‘व्हॉइस असिस्ट’ ‘एमजी हेक्टर’चे सर्वांत अद्भुत असे फीचर आहे. हे एक दमदार व्हॉइस अॅप्लिकेशन असून, ते क्लाउड आणि हेड युनिटवर चालते. न्यूआन्सने ते एमजी इंडियासाठी विकसित केले असून, ते विशेष करून भारतासाठी भारतीय उच्चारांनुसार बनवले आहे.

यातील बिल्ट-इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम्समुळे वापर वाढत जाईल तसतशी ही प्रणाली शिकत जाईल आणि अधिकाधिक चांगली होईल. हे व्हॉइस असिस्ट ‘हॅलो एमजी’ म्हटल्याने सक्रिय होते व १०० कमांड्स जाणते, ज्यात खिडक्या आणि सन-रूफ उघडणे किंवा बंद करणे, एसी नियंत्रण, नेव्हिगेशन आदींचा समावेश आहे; तसेच कनेक्टिव्हिटी क्षीण असली, तरी ते काम करते.

आयस्मार्ट नेक्स्ट जेन हे आयस्मार्ट मोबाइल अॅपद्वारा चालते. एमजी आयस्मार्ट अॅपमध्ये अशी अनेक फीचर्स आहेत, जी भारतीय बाजारात अजून आलेली नाहीत. प्रत्येक वेळी अॅप सुरू केल्यानंतर कार स्कॅन केली जाते आणि कारचे लोकेशन, टायरमधील प्रेशर किंवा दार लॉक झालेले आहे की नाही अशा प्रकारची माहिती त्यात आहे. दरवाजे थेट लॉक किंवा अनलॉक करण्यासाठी, इग्निशन सुरू करण्यासाठी आणि एअर कंडिशनर सुरू करण्यासाठी रिमोट अॅप वापरू शकतात. भारतातील तीव्र हवामान परिस्थितीत हे खूप उपयोगी आहे. हे सर्व्हिसचे वेळापत्रक बनवायलादेखील मदत करते आणि सर्व्हिस केल्याचा माग देखील ठेवते.

एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, ‘इंटरनेट आणि कार्सच्या एकत्रीकरणामुळे नव्या फीचर्सचा मार्ग खुला होईल व त्यामुळे भारतातील ‘एमजी’च्या ग्राहकांना एक निर्विघ्न आणि अपडेटेड स्वामित्वाचा अनुभव मिळेल. एम्बेडेड सिमकार्ड आणि ओटीएसह एमजी हेक्टर हळूहळू अनेक नवीन गोष्टी करेल, आपल्या क्षमता सतत विस्तारित जो सतत निर्विघ्न ड्रायव्हिंगचा अनुभव देईल. शिवाय भारतात फाइव्ह-जी कनेक्टिव्हिटीच्या आगमनाने एमजी कार्स नवीन, अभूतपूर्व फीचर्स दाखल करण्यास सक्षम होईल व त्यामुळे कार ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी सुधारेल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search