Next
कॉमिओतर्फे नवीन मोबाइल सादर
प्रेस रिलीज
Friday, February 16 | 06:13 PM
15 0 0
Share this story

मुंबई : कॉमिओ इंडिया या स्मार्टफोन ब्रँडने नवीन वैशिष्टयांनी समृद्ध कॉमिओ एस१ लाइट आणि सी२ लाइट हे दोन स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत. सौंदर्य आणि कार्यक्षमता या दोन्ही बाबी लक्षात ठेवून डिझाइन करण्यात आलेले हे स्मार्टफोन्स एस१ लाइट सात हजार ४९९ रुपये आणि सी२ लाइट पाच ९९९ रुपये एवढ्या किंमतीत आणले आहेत.
 
आधीच्या मॉडेल्सच्या यशस्वी अनावरणाच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जात असताना नवीन कॉमिओ एस१ लाइट आणि सी२ लाइटमध्ये कॉमिओ एस१ आणि सी२ या कॉमिओच्या सर्वाधिक लोकप्रिय स्मार्टफोन्सची अत्यंत सुंदर डिझाइन आहे आणि हे फोन्स पुढील आठवड्यापासून उत्तर आणि पश्चिमेकडील बाजारांमध्ये उपलब्ध होतील. लाइट रेंजमध्ये अत्यंत आगळीवेगळी वैशिष्टे आहेत जसे सुंदर डिझाइन, कॉमिओ यूआयवर आधारित ऑन स्टॉक अँड्रॉइड ओएस, शक्तिशाली बॅटरी बॅकअप, ओटीजी आणि इतर अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत.
 
कॉमिओ स्मार्टफोन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक संजय कलिरोना म्हणाले, ‘भारत ही वाढती बाजारपेठ असून येथे प्रचंड क्षमता आणि अगणित शक्यता आहेत. आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी आमची नवीन उत्पादने- कॉमिओ एस१ लाइट आणि सी२ लाइट आणताना खूप आनंद वाटत आहे. त्यात फक्त सुंदर डिझाइन आणि कॅमेराच नाही तर उत्तम बॅटरी आयुष्यही आहे. ही लाइट मालिका ऑलराऊंडर ठरेल यात शंका नाही. उत्तम दर्जाची उत्पादने सर्व ग्राहकांना उत्तम किमतीत देण्यावर कॉमिओचा विश्वास आहे.’
 
एस१ लाइटसोबत येणारे उत्तम डिझाइन आणि डिस्प्लेसोबत नजरेत उठून दिसाल ज्यात १३ मेगापिक्सेल रेअर आणि आठ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि सौंदर्य, बोके, पॅनोरमा, वॉटरमार्क, एचडीआर, फिल्टर आणि स्माइल कॅप्चर इफेक्ट्स यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. कॉमिओ एस१ लाइटमध्ये एक युनिबॉडी डिझाइन आहे आणि वळणदार कोपरे आहेत. हा फोन ओशियन ब्लू, रॉयल ब्लॅक आणि सनराइज गोल्ड या तीन रंगांत उपलब्ध आहे. या हँडसेटचा यूएसपी त्याच्या स्लिम डिझाइनमध्ये आणि मेटॅलिक फिनिशमध्ये आहे, ज्यामुळे फोन वापरण्यास अत्यंत सुलभ होतो. कॉमिओ एस१ लाइटच्या मागील बाजूस बॅक कव्हर फिनिश आहे. यात ५.० इंच एचडी आयपीएस डिस्प्ले दाखवणार्‍या सडपातळ, सरळ बॉडीसह असलेल्या या फोनमध्ये २ आणि ३२ जीबी रॅम तसेच ३०५० एमएएच बॅटरी आहे.

फुल्ली लोडेड कॉमिओ सी२ लाइटमध्ये ली पॉलिमर आणि ३९०० एमएएच बॅटरी आहे. कॉमिओ सी२ लाइटमध्ये विविध प्रकारची उत्तम वैशिष्टे आहेत. त्यात एक सिक्युरिटी फीचर्स, आठ मेगापिक्सेल ऑटो फोकस रीअर कॅमेरा फ्लॅशसोबत पाच मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा एक्स्पांडेबल १२८ जीबी मेमरी आहे. यात मुख्य लक्ष डिझाइनवर देण्यात आले आहे. सी२ लाइटमध्ये एक पाच इंच एचडी आयपीएस डिस्प्ले असून, तो सनराइज गोल्ड, रॉयल ब्लॅक आणि मेटॅलिक ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे.

या कॅमेर्‍याचे ब्युटी फंक्शन हे आणखी एक वैशिष्टय आहे. त्यात स्टॉक अँड्रॉइड ७.० नगेटवर आधारित कॉमिओ यूआय आहे. कॉमिओ सी२ लाइटमध्ये ३९०० एमएएच बॅटरी असून ती दोन दिवसांपर्यंत चार्ज राहते आणि त्यात २७ तासांचा टॉकटाइम तसेच २७० तासांचा स्टँडबाय टाइम मिळतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link