Next
‘ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन’च्या अध्यक्षपदी विक्रम मक्कर
प्रेस रिलीज
Monday, October 08, 2018 | 02:54 PM
15 0 0
Share this story

विक्रम मक्करपुणे : येथील ‘ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम मक्कर यांची ‘ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन’च्या (एआयआरआयए) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. कोलकाता येथे झालेल्या ‘एआयआरआयए’च्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नुकतीच ही घोषणा करण्यात आली. 

विक्रम मक्कर हे रसायन अभियंता (केमिकल इंजिनिअर) असून, त्यांनी युनायटेड किंग्डममधून (युके) रबर टेक्नॉलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. तंत्रज्ञ असलेल्या विक्रम यांना रबर उद्योगाचा २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी त्यांचे प्रशिक्षण पश्चिम जर्मनीतील सीपेंलकांप, तसेच अन्य नामवंत कंपन्यांतून पूर्ण केले आहे. मक्कर यांनी ‘एआयआरआयए’च्या तंत्रशिक्षण समितीचे सदस्य आणि ‘एआयआरआयए’च्या उपाध्यक्षपदाचीही जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.

रबर उद्योगातील उत्तम कामगिरीचा पूर्वेतिहास असलेल्या विक्रम यांना प्रकल्प अंमलबजावणी, उपकरणे निवड व आधुनिकीकरणाचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांच्याकडे प्रक्रिया व संमिश्रण यातील तांत्रिक स्पर्धात्मकता, तसेच उत्पादन व खरेदी यातील कौशल्यही आहे. मक्कर हे तिसऱ्या पिढीचे उद्योजक असून, त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज कंपनी भारतातील कन्व्हेयर बेल्ट्सची एक सर्वांत मोठी उत्पादक म्हणून उदयाला आली आहे.

‘एआयआरआयए’च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बोलताना मक्कर म्हणाले, ‘एआयआरआयए पुढील वर्षाच्या सुरवातीस ‘इंडिया रबर एक्स्पो’ प्रदर्शनाच्या आयोजनासाठी सज्ज होत असतानाच माझी या संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. हे प्रदर्शन आशियातील अशा स्वरुपाचे सर्वांत मोठे असून, ते मुंबईत १७ ते १९ जानेवारी २०१९ या कालावधीत होणार आहे. रबर उद्योगातील बहुप्रतिक्षीत कार्यक्रमांपैकी ठरलेले हे प्रदर्शन आम्हाला याखेपेसही  यशस्वी करुन दाखवायचे आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link