Next
रमेश बालसेकर, देविदास वाडेकर
BOI
Friday, May 25, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

अद्वैत तत्त्वज्ञानाचे प्रमुख प्रचारक व लेखक रमेश बालसेकर आणि मराठी तत्त्वज्ञानाचे कोशकार आणि प्राध्यापक देविदास वाडेकर यांचा २५ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
........
रमेश बालसेकर

२५ मे १९१७ रोजी जन्मलेले रमेश बालसेकर हे श्री निसर्गदत्त महाराजांचे प्रमुख शिष्य आणि अद्वैत तत्त्वज्ञानाचे उपासक आणि प्रचारक होते. रमण महर्षी यांनी मांडलेले विचार पुढे नेण्याचं महत्त्वाचं काम रमेश बालसेकर यानी केलं होतं. मनाचा समतोल राखून जीवनातली शांतिपूर्वक परिस्थिती कशी हाताळायची, यावर ते लोकांना मार्गदर्शन करत असत. ‘इगो’ (अहंकार) आणि ‘व्यक्तिगत धर्म’ यांवर त्यांनी मांडलेले विचार प्रसिद्ध आहेत. जवळपास चाळीसेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. 

अष्टवक्र गीता सार, गुरुपौर्णिमा, दी एंड ऑफ ड्युअलिटी, ९० स्टेप्स टू वननेस, दी ओन्ली वे टू लिव्ह, लेट लाइफ फ्लो, पीस अँड हार्मनी इन डेली लिव्हिंग, दी सीकिंग, कॉन्शसनेस इज ऑल देर इज, कोण पर्वा करतो?, पर्स्यू हॅपिनेस अँड गेट एनलाइटन्ड, क्विक डोज, सेल्फ रीअलायझेशन अँड फ्री विल, तुमचा स्वतःचा व्यक्तिगत धर्म, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

२७ सप्टेंबर २००९ रोजी त्यांचं निधन झालं.

(रमेश बालसेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
...... 

देविदास दत्तात्रेय वाडेकर

२५ मे १९०२ रोजी कुरोलीमध्ये (सातारा) जन्मलेले देविदास दत्तात्रेय वाडेकर हे कोशकार आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. भगवद्गीता आणि ग्रीक तत्त्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. तत्त्वज्ञानाचा अभ्यास त्यांनी आगरकरांच्या मार्गदर्शनाखाली केला होता. 

त्यांचा तर्कशास्त्राचाही अभ्यास होता. त्यांनी तर्कशास्त्रावर ग्रंथ लिहिले आहेत. मराठी तत्त्वज्ञान कोशाच्या तीन खंडांची निर्मिती त्यांनी केली होती. ‘प्राचीन मराठी पंडिती काव्य’सारखे ग्रंथ त्यांनी लिहिले. या ग्रंथातून त्यांनी पंडिती काव्याची समीक्षा केली. 

नलदमयंती कथा, किरातार्जुनीय कथा, माझी वाटचाल, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

पाच मार्च १९८५ रोजी त्यांचं निधन झालं.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link