Next
‘ओएमएल’ला रिझर्व्ह बँकेकडून नोंदणी प्रमाणपत्र
प्रेस रिलीज
Wednesday, June 20, 2018 | 04:35 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ओएमएल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. ही कंपनी ओएमएल पी२पी या ऑनलाइन पिअर टू पिअर लेंडिंग बाजारपेठेची मालक आणि संचालक कंपनी असून, आता ही कंपनी एक एनबीएफसी पी२पीम्हणून अधिकृतरीत्या स्थापित झाली आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये जारी आरबीआयच्या दिशानिर्देशानुसार डिसेंबर २०१७ मध्ये ओएमएल ही पीअर टू पीअर लेंडिंग मंच म्हणून अर्ज करणारी पहिली कंपनी होती.

याबाबत बोलताना ओएमएल  टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेन्द्र कुमार जालन म्हणाले, ‘गेल्या वर्षी आरबीआयने मांडलेल्या सर्व नियामक आवश्यकता पूर्ण करणारे बिझनेस मॉडेल असलेली आमची कंपनी एनबीएफसी पी२पी नोंदणीसाठी अर्ज करणारी भारतातील पहिली पीअर टू पीअर लेंडिंग कंपनी होती. मान्यतेचे प्रमाणपत्र मिळणे हे मोठे यश असून ते कंपनीच्या तसेच भारताच्या पी२पी लेंडिंग क्षेत्राच्या विकासाच्या नवीन टप्प्याची नांदी देणारे आहे.’

ओएमएल टेक्नॉलॉजीजची स्थापना २०१६ साली मुंबईत झाली. कंपनीने आपली प्रक्रिया काटेकोरपणे तयार केली आहे जेणे करून नियमांचे पालन, ग्राहक सुविधा, व्यवहारातील पारदर्शकता आणि परतफेडीसाठी साहाय्य या बाबी सांभाळल्या जातील आणि एक असे बिझनेस मॉडेल तयार होईल ज्याचा उपयोग करून कंपनी भारतात नुकत्याच अस्तीत्वात आलेल्या पी२पी लेंडिंग क्षेत्रात स्वतःला अग्रणी म्हणून स्थापित करू शकेल. सध्या ही कंपनी भारतभरातील ३२ शहरांत कार्यरत  आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search