Next
पुण्यात उस्ताद अल्लाँरखाँ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम
प्रेस रिलीज
Thursday, April 25, 2019 | 05:57 PM
15 0 0
Share this article:

आदित्य कल्याणपूरकरपुणे : ‘ख्यातनाम तबलावादक उस्ताद अल्लाँरखाँ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जागतिक कीर्तीच्या तबलावादकांचे एकल तबलावादन ऐकण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. येथील ‘सा’ व ‘नी’ सूरसंगीत संस्थेने हा कार्यक्रम २७ व २८ एप्रिल २०१९ रोजी जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केला आहे,’ अशी माहिती ‘सा’ व ‘नी’ सूरसंगीत संस्थेचे सुरेंद्र मोहिते यांनी दिली.

पंडित सुरेश तळवलकरसर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. उस्ताद अल्लाँरखाँ हे तबल्यातील अत्यंत मोठे नाव आहे. संगीत क्षेत्रामध्ये ‘तबला संगीत’ या विषयात क्रांतिकारी बदल घडवून त्यायोगे तबलावादकाला आपले वेगळे स्थान निर्माण करून देण्याचे अमूल्य काम उस्ताद अल्लाँरखाँ यांनी केले. त्यांचे हे योगदान फार मोठे असल्याने त्यांना व त्यांच्या योगदानाला कोणी विसरू शकत नाही. त्यांच्याप्रती हाच आदर व्यक्त करीत त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी सर्व तबला वादक पुण्यात एकत्र येत त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

उस्ताद अल्लाँरखाँया कार्यक्रमाला २७ एप्रिलला सायंकाळी ४.३० वाजता औपचारिक उद्घाटनाने सुरुवात होईल. या वेळी पंडित स्वपन चौधरी, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित आनिंदो चटर्जी, पंडित योगेश समसी, पंडित शुभंकर बॅनर्जी, उस्ताद अक्रम खान, सत्यजित तळवलकर, आदित्य कल्याणपूरकर आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अनेक नामवंत तबलावादक उपस्थित राहणार आहेत. या नंतर उस्ताद अल्लाँरखाँ खाँ यांचे शिष्य आदित्य कल्याणपूरकर यांच्या वादनाने कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर सत्यजित तळवलकर, पंडित शुभंकर बॅनर्जी, उस्ताद अक्रम खान यांचे एकल तबला वादन होईल.

उस्ताद अक्रम खान२८ एप्रिलला सकाळी नऊ वाजता कार्यमाची सुरुवात होणार असून यात सुरुवातीला योगेश समसी, पंडित आनिंदो चटर्जी, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचे एकल तबलावादन होईल. स्वपन चौधरी यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप होईल. सर्व तबलावादकांना तन्मय देवचके व अभिषेक शिनकर (संवादिनी) आणि नागेश आडगांवकर (गायन नगमा) हे साथसंगत करणार आहेत.

पंडित आनिंदो चटर्जीया कार्यक्रमादरम्यान प्रत्येक वादनानंतर उस्ताद अल्लाँरखाँ यांवरील छोटीशी फिल्म दाखविण्यात येईल. खाँसाहेबांनी काही हिंदी चित्रपटांना ‘ए आर कुरेशी’ या नावाने संगीत दिले आहे. त्या गाण्यांचे ऑडिओ रेकॉर्ड्सही येथे कार्यक्रमादरम्यान ऐकविले जातील.

कार्यक्रमाविषयी : 
दिवस : २७ व २८ एप्रिल २०१९
वेळ : सायंकाळी ४.३० वाजता 
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, पुणे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search