Next
‘वाइब्स पुणे’तर्फे लठ्ठपणाबाबत जागृती रॅली
प्रेस रिलीज
Saturday, November 24, 2018 | 11:41 AM
15 0 0
Share this article:

पुणे : वाइब्स पुणे या संस्थेतर्फे जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त लठ्ठपणाविरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी सात वाजता भांडारकर रस्त्यावरील संस्थेच्या कार्यालयातून निघेल.

विधी भांडारकर रस्ता, विधी महाविद्यालय, राष्ट्रीय चित्रपट संग्रहायलमार्गे प्रभात रस्ता, कर्वे रस्ता ते गुडलक चौक असा रॅलीचा मार्ग असेल. याबरोबरच कल्याणीनगर परिसरातही संस्थेतर्फे लठ्ठपणा जागृतीसाठी रॅली काढली जाणार आहे.  

आरोग्य व सौंदर्य क्षेत्रात १९९६ पासून कार्यरत असलेल्या ‘वाइब्स’ संस्थेकडून दर वर्षी जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त लठ्ठपणाबाबत जनजागृती केली जाते. अनेक गंभीर आजारांच्या मुळाशी लठ्ठपणा असू शकतो. अतिरिक्त वजनामुळे रक्तदाब, हायकोलेस्ट्रॉल व शरीराच्या तक्रारींमुळे हार्ट अॅटॅकचा धोकाही वाढतो. अतिउच्च रक्तदाबाच्या ५० टक्क्यांहून अधिक केसमध्ये पेशंटना हा त्रास फक्त अधिक वजनामुळे होतो. वाढत्या वजनामुळे मधुमेह होण्याचे प्रमाणही बरेच आहे. सांध्याचेही विकार जडतात, तसेच अतिरिक्त वजनामुळे सांध्याच्या नाजूक आवरणावरही ताण येतो. लठ्ठपणाशी निगडीत आजारांमध्ये निद्रानाश, हार्निया, व्हेरीकोज वेन्स, सांध्याचे विकार, मूत्राशयाचे आजार, श्वास अडकून अचानक मृत्यू यांसह श्वसनाच्या अनेक आजारांचा समावेश आहे.

लठ्ठपणा कमी करून त्यावर नियंत्रण मिळवण्याची गरज असल्याचे नमूद करून जास्तीत जास्त नागरिकांनी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

रॅलीविषयी :
दिवस :
रविवार, २५ नोव्हेंबर २०१८
वेळ : सकाळी सात वाजता
स्थळ : वाइब्स पुणे संस्थेचे कार्यालय, भांडारकर रस्ता, पुणे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search