Next
‘आयसीआयसीआय’तर्फे ओडिशातील मदतकार्यासाठी १० कोटी
प्रेस रिलीज
Thursday, May 09, 2019 | 03:40 PM
15 0 0
Share this article:


भुवनेश्वर : ओडिशातील फनी चक्रिवादळाचा तडाखा बसलेल्या परिसरामध्ये मदतकार्य व सहकार्य करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेतर्फे राज्य सरकारला व स्थानिक प्रशासनाला १० कोटी रुपयांची मदत केली. या योगदानातील बहुतांश रक्कम मुख्यमंत्री मदतनिधीसाठी देण्यात आली आहे. बँकेने मदतकार्यासाठी जिल्हास्तरावरही मदत दिली आहे.

या बरोबरच, वादळाचा फटका बसलेल्या राज्यातील अन्य भागांतील ग्राहकांना मदत करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने विविध उपाय जाहीर केले आहेत. चक्रिवादळाचा तडाखा बसलेल्या ग्राहकांना गृह, वाहन व वैयक्तिक अशा रिटेल कर्जांचा मे महिन्यातील ईएमआय भरण्यास विलंब झाल्यास बँक त्यावरील दंड माफ करणार आहे. तसेच, या महिन्यात क्रेडिट कार्डावरील थकबाकी भरण्यास विलंब झाल्यास दंड आकारला जाणार नाही व चेक बाउन्स झाल्यासही शुल्क आकारले जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणाले, ‘ओडिशाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आम्ही आयसीआयसीआय बँकेचे आभारी आहोत. आयसीआयसीआय बँकेने राज्यातील मदतकार्यासाठी व पुनर्वसनासाठी १० कोटी रुपयांची मदत दिली आहे.’

राज्यातील परिस्थितीविषयी बोलताना, आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, ‘अशा संकटाच्या वेळी आमच्या प्रार्थना व ओडिशातील रहिवाशांच्या पाठीशी आहेत. आयसीआयसीआय बँकेमध्ये आम्ही ओडिशातील लोकांना मदत करण्यासाठी आणि आमच्या स्वतःच्या उपक्रमांद्वारे आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्या सहयोगाने त्यांना या नैसर्गिक संकटातून बाहेर येण्यास मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search