Next
मराठीतील सुपरस्टार कलाकार रंगवणार ‘जीवलगा’
अमृता खानविलकरसह स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर दीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर
BOI
Saturday, March 23, 2019 | 06:13 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : आपल्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सुपरस्टार्स अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी कलाकार प्रदीर्घ कालावधीनंतर आता छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील जीवलगा या मालिकेतून हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

सिद्धार्थ चांदेकर नऊ वर्षांनी आणि स्वप्नील जोशी तब्बल सात वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तर अभिनेत्री अमृता खानविलकरची छोट्या पडद्यावर काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अमृता या मालिकेबाबत विशेष उत्सुक आहे. ‘ही मालिका कोणत्या चित्रपटापेक्षा कमी नाही. माझ्यासाठी कोणतीही सुरुवात ही नेहमीच उत्साहाची असते. माझी ही पहिली मालिका असल्यामुळे मी या मालिकेबाबत विशेष उत्सुक आहे. या भूमिकेवर काम करत असताना ही भूमिका माझ्या जीवनाचाच एक भाग होऊन गेली आहे’, अशा भावना अमृता खानविलकरने व्यक्त केल्या आहेत. 

नवरा-बायकोमधील नाते फुलवणारी ही एक आगळी-वेगळी मालिका आहे जी प्रत्येकाला भावणारी अशी आहे. येत्या आठ एप्रिलपासून ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेबाबत सांगताना स्टार प्रवाह वाहिनीच्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट करण्यात आले आहे. त्यात एका छोट्या कवितेतून या मालिकेबाबत सांगितले आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search