Next
पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव
भाजपचेच सचिन चिंचवडे झाले उपमहापौर
BOI
Saturday, August 04, 2018 | 06:04 PM
15 0 0
Share this story

राहुल जाधवपिंपरी : पिंपरी-चिंचवडचे नवे महापौर म्हणून भारतीय जनता पक्षाचे राहुल जाधव यांची, तर उपमहापौर म्हणून सचिन चिंचवडे यांची निवड झाली आहे. शनिवारी (चार ऑगस्ट २०१८) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या मतदानात या दोघांचा विजय झाला. 

महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक झाली होती. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अपक्ष सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला. या मतदानात शिवसेना तटस्थ राहिली होती. त्यामुळे राहुल जाधव यांना ११३पैकी ८० मते मिळाली. चिंचवडे यांना ७९ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद नढे यांना फक्त ३३ मते मिळाल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 

आता महापौर झालेले राहुल जाधव यांनी १९९७ ते २००२ अशी पाच वर्षे उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवली आहे. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी शेती केली आणि लग्नानंतर काही काळ ते एका कंपनीत चालक म्हणून कामाला लागले. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, त्या वेळी राहुल राजकीय क्षेत्रात आले. ते प्रथम २०१२मध्ये नगरसेवक झाले. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी २०१७मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तेव्हा त्यांच्यासह जाधवही भाजपमध्ये आले होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link