Next
‘सिप्रा’च्या अध्यक्षपदी दयानंद कांबळे यांची बिनविरोध निवड
BOI
Monday, December 31, 2018 | 03:41 PM
15 0 0
Share this article:

राज्य माहिती व जनसंपर्क संघटनेच्या (सिप्रा) अध्यक्षपदी महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचे स्वागत करताना मावळते अध्यक्ष संजय सक्सेना.

नवी दिल्ली : महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांची दिल्लीस्थित राज्य माहिती व जनसंपर्क संघटनेच्या (सिप्रा) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ‘सिप्रा’चे मावळते अध्यक्ष संजय सक्सेना यांनी कांबळे यांचे स्वागत केले. या वेळी छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, बिहार आणि राजधानी दिल्लीच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे दिल्लीस्थित अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र परिचय केंद्रात नुकत्याच झालेल्या ‘सिप्रा’च्या सर्वसाधारण बैठकीत ही निवड करण्यात आली. येत्या आठवड्यात कार्यकारिणीच्या अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.


‘सिप्रा’ ही संघटना दिल्लीत जवळपास १५ वर्षांपासून कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांना राष्ट्रीय स्तरावर मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांकडून शासनातील प्रभावी जनसंपर्कासाठी वापरण्यात येणारे विविध माध्यम यावर चर्चा करण्यात येते. विविध राज्यांच्या चांगल्या कार्याचा गौरव व विचारांची देवाणघेवाण करणे आदी काम सिप्रा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search