Next
‘महिला व बालकल्याण’तर्फे रत्नागिरीत महिलांसाठी प्रशिक्षण
BOI
Saturday, June 22, 2019 | 03:47 PM
15 0 0
Share this article:

संग्रहित फोटोरत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे २२ व २३ जून २०१९ रोजी शहरातील महिलांसाठी विनामूल्य प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीच्या उपसभापती अस्मिता सुशील चवंडे यांनी दिली. 

महिलांना स्वावलंबी बनवून आपल्या कुटुंबासाठी अर्थाजन करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. २२ जूनला दुपारी दोन ते सायंकाळी सहा वेळेत कापडी पिशव्या व पर्स बनविणे, तर २३ जूनला दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळेत माशांपासून लोणचे तयार करणे यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हे प्रशिक्षण रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक तीन चवंडेवठार येथे दिले जाईल. या प्रशिक्षण कार्यक्रमात शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उपसभापती अस्मिता चवंडे यांनी केले आहे. 
           
प्रशिक्षणाविषयी :
दिवस : २२ व २३ जून २०१९ 
वेळ : दुपारी दोन ते सायंकाळी सहा
स्थळ : रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक तीन, चवंडेवठार, रत्नागिरी.
अधिक माहितीसाठी : अस्मिता चवंडे- ७९७२१ ४५४०४, ९८६०६२६१२९
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search