Next
रत्नागिरीतील विद्यार्थी घालणार दीड लाख सूर्यनमस्कार
BOI
Thursday, February 14, 2019 | 05:14 PM
15 0 0
Share this story

सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक दाखविताना विश्वनाथ बापट

रत्नागिरी :
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे १६ फेब्रुवारी २०१९ रोजी दीड लाख सूर्यनमस्कारांच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोसायटीच्या शाळा, गुरुकुल आणि शहरातील अन्य शाळांमधील सुमारे चार ते पाच हजार विद्यार्थी, नागरिक, शिक्षक असे सर्व जण मिळून एकूण दीड लाख सूर्यनमस्कार या वेळी घालणार आहेत. पहाटे साडेपाच ते सकाळी साडेनऊ या वेळेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानावर हा उपक्रम होणार आहे. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. 

या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेला सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, नियामक मंडळ सदस्य आनंद देसाई व ‘कै. बाबुराव जोशी गुरुकुल’चे प्रमुख किरण जोशी, प्रसाद गवाणकर उपस्थित होते. ‘विद्यार्थ्यांनी आयुष्यभर सूर्यनमस्कार घातले, तर ते तंदुरुस्त राहतील. सूर्यनमस्कार दिन एकाच दिवशी नव्हे, तर कायमस्वरूपी साजरा व्हावा या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे,’ असे सांगण्यात आले. 

आतापर्यंत अकरा लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घालणारे विश्ववनाथ बापट यांचे मार्गदर्शन या वेळी लाभणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने सूर्नमस्कार कसे घालावेत, याचे मार्गदर्शन ते विद्यार्थ्यांना करणार आहेत. (विश्वनाथ बापट यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) मैदानावर आवश्यक ती बैठकव्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

रथसप्तमीला जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा होतो. या दिवशी अनेक शाळांमध्ये हा उपक्रम झाला; मात्र मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी होण्यासाठी शनिवारी आयोजन करण्यात आहे. या उपक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. पालक आणि रत्नागिरीकरांनीही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

‘गुरुकुल’चे प्रमुख किरण जोशी यांनी म्हणाले, ‘गेल्या वर्षी चार हजार विद्यार्थ्यांनी मिळून एक लाख ३४ हजार सूर्यनमस्कार घातले होते. त्यातील काही विद्यार्थ्यांनी सर्वाधिक ३५० सूर्यनमस्कारही घातले होते. सूर्यनमस्कार म्हणजे सर्वांगासन आहे. शहरातील तीन गुरुकुल शाळांमध्ये नियमित सूर्यनमस्कार घातले जातात. अन्य शाळांमध्येही आमचे विद्यार्थी, तसेच अन्य शिक्षक मार्गदर्शन करतात.’

(११ लाखांहून अधिक सूर्यनमस्कार घालणारे विश्वनाथ बापट यांचे मनोगत, तसेच त्यांनी दाखविलेले शास्त्रोक्त सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक पाहा सोबतच्या व्हिडिओत...) 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link