Next
‘विठूमाऊली’ टीमची पावसाळी सहल उत्साहात
प्रेस रिलीज
Saturday, June 30 | 05:23 PM
15 0 0
Share this story

मुंबई : एखाद्या दिवशी अचानक सुट्टी मिळावी आणि सहजच एखादा सहलीचा प्लॅन ठरावा असे फार क्वचित घडते; मात्र, हे जेव्हा घडते तेव्हा ती सहल कायमच लक्षात राहते. ‘स्टार प्रवाह’वरील ‘विठूमाऊली’ मालिकेच्या टीमला अशीच एक धम्माल सहल करण्याची संधी नुकतीच मिळाली. सुट्टी मिळताच ‘विठूमाऊली’च्या टीमने थेट भंडारदरा गाठले आणि वर्षा सहलीचा आनंद घेतला.

उद्याचे शूट रद्द झाल्याची माहिती ‘विठूमाऊली’च्या टीमला आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता समजली. अचानक मिळालेली ही सुट्टी सत्कारणी लावावी या विचारातून नियोजन सुरू झाले आणि इतर काही करण्यापेक्षा मस्त पावसाळी सहल करावी, यावर सगळ्या टीमचे एकमत झाले. सुट्टीच्या दिवशी भंडारदरा गाठत तिथल्या जवळच्या भावली गावात जाऊन ‘विठूमाऊली’ टीमने पावसाचा मनसोक्त आनंद लुटला.

‘आम्ही सर्वांनी खूप धम्माल केली, कामाचा शीण विसरायला लावून नवी ऊर्जा देणारी ही एक दिवसाची सहल होती,’ अशी प्रतिक्रिया ‘विठूमाऊली’ साकारणाऱ्या अजिंक्य राऊतने दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link