Next
‘भाजपच्या यशात गोपीनाथ मुंडे यांच्या कष्टांचा महत्त्वाचा वाटा’
मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त भाजप प्रदेश कार्यालयात आदरांजली
BOI
Monday, June 03, 2019 | 06:06 PM
15 0 0
Share this article:मुंबई :
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्ताने तीन जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ‘लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या यशामागे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी केलेल्या पक्षबांधणीचा मोठा वाटा आहे,’ असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी या वेळी सांगितले. 
 
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, महिला मोर्चा अध्यक्ष ॲड. माधवी नाईक, दीव-दमणचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, आमदार मनीषा चौधरी, प्रदेश चिटणीस संजय उपाध्याय, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, विश्वास पाठक, अतुल शाह आणि मुंबई भाजपचे सरचिटणीस अमरजित मिश्रा उपस्थित होते.  
 
ॲड. आशिष शेलार म्हणाले, ‘यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या विजयामध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी त्या वेळी पक्षाच्या बांधणीसाठी घेतलेल्या कष्टांचा आणि संघर्षाचा महत्त्वाचा वाटा आहे. १९८० साली भाजपची स्थापना झाल्यापासुन मुंडेसाहेबांनी आपले राजकीय जीवन पक्षासाठी समर्पित केले. प्रमोद महाजन यांच्यासोबत गावागावात एसटी, मोटारसायकल आणि सायकलवरून प्रवास करून त्यांनी पक्षबांधणीचे मोलाचे कार्य केले. अनेकदा अपयश येऊनही ते कधी खचले नाहीत. निडरपणे ते आपले कार्य करीत राहिले. त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान असणाऱ्या कार्यकर्त्यांसोबतही काम करताना त्यांना कधीच वयाचा अडसर आला नाही. ते अगदी सहजतेने, निडरपणे कार्य करीत असत, हे त्यांच्या कार्यपद्धतीचे खास वैशिष्ट्य आहे.’ 
 
‘सामान्य कुटुंबातून आलेल्या मुंडेसाहेबांनी नेहमी खेड्यातील गरीब मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्यांच्यासाठी शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. ऊसतोड कामगारांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी त्यांनी ऊसतोड कामगारांचे नेतृत्व केले. तसेच आशियातील सर्वांत मोठ्या साखर कारखान्याची स्थापना केली. समाजातील प्रत्येक घटकाचा ते विचार करीत असत. म्हणून अल्पसंख्याक आणि ओबीसी समाजातील जनताही त्यांना आपले नेते मानत,’  असे शेलार म्हणाले. 
 
या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी होऊन फुले अर्पण करून गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search