Next
सुधीर दळवी यांना यंदाचा ‘एकता कला गौरव’
एकता कल्चरल अकादमीतर्फे विविध पुरस्कारांची घोषणा
BOI
Friday, January 04, 2019 | 12:59 PM
15 0 0
Share this article:

अभिनेते सुधीर दळवीठाणे : एकता कल्चरल अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा अकादमीचे अध्यक्ष कवी प्रकाश जाधव यांनी केली असून, यंदाचा एकता कला गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते सुधीर दळवी यांना जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे डॉ. गणेश चंदनशिवे, सुहास बिरहाडे, विशाल पाटील, डॉ. कनक नागले, प्रभाकर मोसमकर यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.  

नाटककार जयंत पवार, साहित्यिक अशोक बेंडखळे, दूरदर्शन निर्माते शरण बिराजदार यांच्या निवड समितीने या पुरस्कारांची निवड केली आहे. महोत्सवाचा सांगता सोहळा आणि पुरस्कार वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ जानेवारी २०१९ रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे.

सुधीर दळवी यांच्यासह लोकजागरसाठी डॉ. गणेश चंदनशिवे यांना उज्जय आंबेकर पुरस्कृत मधू आंबेकर स्मरणार्थ विठ्ठल उमप स्मृती पुरस्कार, पत्रकारितेसाठी सुहास बिरहाडे यांना संदेश रामचंद्र जाधव पुरस्कृत रामीबाई रामचंद्र जाधव स्मरणार्थ श्रीकांत पाटील स्मृती पुरस्कार, विशाल पाटील यांना नारायण पेडणेकर स्मृती पुरस्कार, वैद्यकीय सेवेसाठी डॉ. कनक नागले यांना डॉ. नीतू मांडके स्मृती पुरस्कार, संगीता क्षेत्रासाठी प्रभाकर मोसमकर यांना सुबल सरकार स्मृती पुरस्कार, शैक्षणिक कार्यासाठी मनिषा अंधानसरे यांना रत्नाबाई भिकाजी खरटमल पुरस्कृत माणिक भिकाजी खरटमल स्मरणार्थ सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार, प्रकाशन क्षेत्रासाठी अशोक मुळे यांना राजेश जाधव पुरस्कृत काशीनाथ गणपत स्मरणार्थ नारायण सुर्वे स्मृती पुरस्कार दिला जाणार आहे.

समाजसेवेसाठी पल्लवी चौधरी यांना वंदना जाधव पुरस्कृत अहिल्याबाई होळकर स्मृती पुरस्कार, दर्शना नामदे यांना गंगाधर म्हात्रे पुरस्कृत यादव जनार्दन म्हात्रे स्मरणार्थ मृणाल गोर स्मृती पुरस्कार, प्रदीप मोरे यांना प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार, पांडुरंग इंगळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, सरला देढिया यांना जयवंतीबेन मेहता स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
१२ जानेवारी २०१९
वेळ : सायंकाळी चार वाजता
स्थळ : प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search