Next
हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी भगवान कांबळे
BOI
Tuesday, July 23, 2019 | 02:00 PM
15 0 0
Share this article:

हिमायतनगर : येथील पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे यांची नुकतीच बदली झाली असून, त्यांच्या जागेवर भगवान भीमराव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हिमायतनगर येथे मागील दोन वर्षांपासून कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक बोरसे यांनी पोलीस प्रशासनात चांगल्या पद्धतीने सेवा बजावतानाच सामाजिक बांधिलकीही जपली. २० जुलैला नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी बोरसे यांच्या बदलीचे आदेश काढले. त्यांची बदली नांदेड येथे नियंत्रण कक्षात करण्यात आली असून, त्यांच्या जागेवर पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागातून आलेले भगवान कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक कांबळे यांनी प्रथम हिमायतनगर शहरातील जागरूक देवस्थान श्री परमेश्वर मंदिर येथे दर्शन घेतले आणि देवस्थानच्या संचालकांशी गावाविषयी चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी आगामी काळात सर्व गावकऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा वक्त केली. त्यानंतर त्यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search