Next
‘महिलांच्या अभिव्यक्तीला स्थान द्यायला हवे’
प्रेस रिलीज
Thursday, July 05 | 02:29 PM
15 0 0
Share this story



पुणे : ‘महिला शायरांना संधी मिळाली तेव्हा त्यांची अनोखी शायरी जगासमोर आली. पुरुषसत्ताक सांस्कृतिक, सामाजिक दडपणांना झुगारून महिलांमधील शायरीच्या अभिव्यक्तीला समाजात स्थान मिळायला हवे,’ असे प्रतिपादन उर्दू शायरीचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक कॅनडामधील डॉ. सय्यद तकी आबिदी यांनी केले.

आझम कॅंपसच्या असेंब्ली हॉलमध्ये ‘मौजुदा दौर में निसाई शायरी के रूझानात’ या विषयावर चार जुलै रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एमसीई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी भूषविले. या वेळी व्यासपीठावर एमसीई सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, मुनव्वर पीरभॉय, मुमताझ पीरभॉय, डॉ. एन. वाय. काझी, डॉ. मुश्ताक मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. आबिदी म्हणाले, ‘औरत का अंदाज -ए- बयान और है, असे गालिबनेच लिहून ठेवले आहे. १८१८ मध्ये पहिल्या शायरान साहेबाँ दिवान यांच्या शायरीची नोंद झाली. पुरुष थेट शब्दांत आपल्या भावना व्यक्त करू शकतात; मात्र स्त्रियांना सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक तसेच स्वत:चेही दडपण असते. टिकाकारांचे भय असते; मात्र पुरुषसत्ताक सामाजिक व्यवस्थेत महिलांना संधी मिळाली, तर त्या अनोखी शायरी पेश करू शकतात.’

‘महिलांना सर्व मानवी हक्क मिळालेच पाहिजेत; पण अभिव्यक्तीला वाव देणे अधिक महत्त्वाचे आहे. सौंदर्य, रोमान्स विषयावरील शायरीपेक्षा रचनात्मक शायरीला महत्त्व दिले पाहिजे,’ असे डॉ. आबिदी यांनी सांगितले.

डॉ. मुश्ताक मुकादम यांनी प्रास्ताविक केले. व्याख्यानाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link