Next
कर्करोगाच्या अचूक निदानासाठी ‘ऑप्ट्रास्कॅन’ दाखल
प्रेस रिलीज
Thursday, February 01 | 05:34 PM
15 0 0
Share this story

  'ऑप्ट्रास्कॅन' उपकरण सादर करताना ऑप्ट्रा ग्रूप कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अभि घोलपपुणे : कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी ऑप्ट्रा ग्रूप कंपनीने ‘ऑप्ट्रास्कॅन’ हा अत्याधुनिक डिजिटल पॅथोलॉजी प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. कर्करोगाचे अचूक निदान, संशोधन तसेच वेळ वाचवण्यासाठी हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पुण्याचे जैव-वैद्यकीय अभियंता आणि टेक्नोक्रॅट उद्योजक, या वेळी डॉ. अनघा जाधव, आनंद म्हैसकर, डॉ. चंद्रहास गोडबोले, डॉ. स्वप्नील कर्णिक, डॉ. भाग्यश्री गोगटे, डॉ. सुजित जोशी, डॉ. रवींद्र निम्बर्गी आदी मान्यवर उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती देताना अभि घोलप म्हणाले, ‘भारत हा नेहमी आयटी-सेवा देणारा देश म्हणून ओळखला जातो, परंतु भारतात मोठे शोध लावले जात नाहीत, या गोष्टीवर नारायण मूर्ती यांनी निराशा व्यक्त केली होती. मात्र, १५०वर्षांपासून चालत आलेल्या ऑप्टिकल मायक्रोस्कोपीला बदलून एक आधुनिक रोगनिदान पद्धती आणण्यासाठी ‘ऑप्ट्रास्कॅन’ सज्ज आहे. लवकरच इतर देशातील कंपन्या या तंत्रज्ञानाचा परवाना आमच्याकडून घेतील. याआधी फक्त संशोधनापुरते वापरण्यासाठी मर्यादित असलेले ‘ऑप्ट्रास्कॅन’ आता एक परिपूर्ण साधन म्हणून दाखल करण्यात आले आहे. याद्वारे आता संपूर्ण डिजिटल स्लाईड ईमेज संपादन करून ती स्क्रीनवर बघणे, शेयर करणे, ईमेजचे विश्लेषण करणे व व्यवस्थापन करणे अतिशय सोपे झाले आहे’.

ते पुढे म्हणाले, ‘दर वर्षी लाखो भारतीय कर्करोगाचे शिकार होतात. साधारणतः प्रतिदिवस एक हजार ३०० हून  अधिक भारतीय आजारांमुळे मृत्यूमुखी पडतात. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या कर्करोगासंदर्भातल्या  संशोधनानुसार २०२० पर्यंत कर्करोग होण्याचे प्रमाण भारतात २५ टक्क्यांनी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर, देशात एक लाख लोकांमागे केवळ दोन पॅथॉलॉजीस्ट आहेत. हे प्रमाण अत्यंत व्यस्त आहे. जपानमध्ये लाखामागे पाच तर अमेरिकेत हे प्रमाण लाखामागे १८ इतके आहे. त्यामुळे कर्करोग किंवा अन्य रोगांसाठीच्या निदानासाठी आवश्यक पॅथॉलॉजी तपासण्यांमध्ये वेळ जातो, त्यामुळे अचूकतेवरही परिणाम होऊ शकतो. रुग्णाच्यादृष्टीने ही खूप मोठी जोखीम असते तर, पॅथॉलॉजीस्टसाठी हे काम खूप किचकट आणि वेळखाऊ असते. या समस्येवर उपाय म्हणून पारंपरिक मायक्रोस्कोपिक तपासण्यांना पर्याय ठरू शकेल, ते काम अधिक गतिमान आणि अचूक होण्याकरता  ‘ऑप्ट्रास्कॅन’ हे उपकरण विकसित करण्यात आले आहे.या यंत्रामुळे तपासणी नमुन्याच्या स्लाईडच्या इमेजेस तयार केल्या जातात. त्या एकाचवेळी वेगवेगळ्या तज्ञांकडे पाठवणे शक्य होते; तसेच त्यावर अचूक आकाराचे मोजमाप घेणे, ठराविक भाग तपासणे अगदी अचूकपणे शक्य होते. यामुळे दोन पाहण्यांमधला फरक, त्यामुळे होणारा परिणाम टाळणे शक्य होते’. 

हे उपकरण संपूर्णपणे भारतीय बनावटीचे असल्याने त्याची किंमतही परदेशी उपकरणांच्या तुलनेने  कमी ठेवण्यात यश आल्याचे घोलप यांनी नमूद केले. ‘भारत सरकारच्या बायोटेकनॉलॉजी इंडस्ट्रियल पार्टनरशिप प्रोग्रॅमच्या (बीआयपीपी) सहकार्याने ‘ऑप्ट्रास्कॅन’ने त्यांच्या पूर्णपणे वेगळ्या अशा डिजिटल स्लाईड स्कॅनरचे प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.या तंत्रज्ञानाला, कर्करोगाच्या संशोधनामध्ये  तसेच उपचार केंद्रामध्ये, स्थापित मोठी रुग्णालये , संपूर्ण भारतातील निदान प्रयोगशाळा ,स्पोक मॉडेल आणि अग्रगण्य शैक्षणिक आणि संशोधन संस्था या मधून उत्स्फुर्त  प्रतिसाद मिळाला आहे. ‘ऑप्ट्रास्कॅन’ची वाटचाल ही व्यवसायिकीकरणासाठी चांगली व योग्य सुरुवात आहे’, असेही ते म्हणाले.

या वेळी ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट डॉ. सुजित जोशी म्हणाले, ‘ऑप्ट्रास्कॅन डिजिटल पॅथॉलॉजी प्लॅटफॉर्म व्हॅलीडेशनच्या प्रोजेक्टवर काम करणे हा खरोखर एक उत्तम अनुभव होता. ‘ऑप्ट्रास्कॅन’च्या इमेजेस प्रचलीत ब्राईट फील्ड मायक्रोस्कोप इमेजेसच्या तुलनेत समाधानकारक आहेत. ऑप्ट्रास्कॅन हे लहान आकाराच्या प्रयोगशाळांसाठीही उपयुक्त ठरते. या तंत्रज्ञानामुळे सर्व वापरकर्त्यांना पारंपरिक पॅथॉलॉजीकडून डिजिटल पॅथॉलॉजीकडे संक्रमण करण्यास मदत होईल’. 

नवले हॉस्पिटल व महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. भाग्यश्री गोगटे म्हणाल्या, ‘मी ऑप्ट्रास्कॅन उपकरणाचे संपूर्ण स्लाईड स्कॅन प्रमाणित केले आहे.  याचे परिणाम  अतिशय  उत्तम आहेत. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान  परवडण्याजोग्या किंमतीत उपलब्ध झाल्याने वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, प्रयोगशाळामध्ये सहजपणे उपलब्ध करता येईल. यामुळे एकावेळी दहा ते पन्नास विद्यार्थ्यांना शिकविणेही शक्य होणार आहे. पारंपरिक पद्धतीत ते शक्य नव्हते.  डिजिटल  पॅथॉलॉजिच्या  गरजांसाठी हे उपकरण अतिशय फायदेशीर आहे’.

या वेळी उपस्थित डॉ. गोडबोले, डॉ.कर्णिक, डॉ.निम्बर्गी यांनीदेखील या मताला दुजोरा दिला आणि हे उत्पादन पॅथॉलॉजी क्षेत्रात क्रांती घडविणारे असल्याचे स्पष्ट केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link