Next
कृषी विज्ञान केंद्रात महिला दिन
BOI
Friday, March 09, 2018 | 11:32 AM
15 0 0
Share this story

सोलापूर : राहुरी (जि. अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्र आणि येथील महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे यांनी भूषवले.

या वेळी ‘माविम’चे कुंदन शिनगारे, कृषी संशोधन केंद्राचे प्रा. दगडू कदम, मोहोळ ग्रामीण रुग्णालयाच्या वैयकिय अधिकारी डॉ. प्रीती कोन्हे, स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेचे प्रकल्प संचालक किरन माने उपस्थित होते.

अन्नशास्त्र व तंत्रज्ञानचे विषय विशेषज्ञ दिनेश क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात महिला दिनाचे महत्त्व विषद करून कृषी विज्ञान केंद्रामार्फत महिला बचत गटांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कृषीविषयक उपक्रमांची माहिती दिली.

डॉ. दिनेश नांद्रे यांनी ‘केंद्राने केलेल्या कृषी तंत्रज्ञान प्रसाराच्या माध्यमातून महिलांनी उद्योजक म्हणून पुढे यावे,’ अशी अपेक्षा व्यक्त करून ‘कृषीपूरक उद्योग व मूल्यवर्धनाच्या संकल्पनेतून आर्थिक स्तर उंचावता येईल’, असे नमूद केले. कुंदन शिनगारे यांनी ‘बचत गट चळवळीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण झाले पाहिजे,’ असे सांगून त्या अनुषंगाने आयोजित उपक्रमांची माहिती दिली.

डॉ. प्रीती कोन्ही यांनी महिलांचे आरोग्य व त्या बाबत घ्यावयाची काळजी यावर सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी महिला आरोग्य तपसणी शिबीर व कृषी उद्योजकांमार्फत निर्मित अन्नप्रक्रिया व शोभनीय उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित केले.

क्षीरसागर यांनी पोषक परसबाग संकल्पना व स्वयं सहायता गटासाठी अन्न प्रक्रिया उद्योगातील संधींबाबत, तर विषय विशेषज्ञ डॉ. तानाजी वळकुंडे यांनी शेळीपालन व परसातील कुक्कुटपालनाबाबत सविस्तर माहिती दिली.

विषय विशेषज्ञ काजल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी ‘माविम’ आणि स्वयं शिक्षण प्रयोग यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र जाधव, ज्ञानेश्वर तांदळे, नितीन बागल व  अरूण गांगोडे यांनी विशेष प्रयत्न केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
दत्तात्रय भोसले About
अशा कार्यक्रमांमुळे शेती क्षेत्रात मोठ्या संख्येने महिला येतील . त्यामुळे शेती अधिक समृद्ध होण्यास मदत होईल . ही बातमी फक्त बाईट्स ऑफ इंडियावरच वाचायला मिळाली हेही विशेषच .
0
0

Select Language
Share Link