Next
‘जीकेएस’ महाविद्यालयात लोकशाही उत्सव साजरा
मिलिंद जाधव
Thursday, January 31, 2019 | 01:07 PM
15 0 0
Share this story



कल्याण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल व लोकशाहीबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने कल्याण तालुक्यातील खडवली येथील ‘जीकेएस’ महाविद्यालयात लोकशाही उत्सव साजरा करण्यात आला.

या वेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून संविधान अभ्यासक अमोल मडामे उपस्थित होते. त्यांनी संविधान, महिलांचे अधिकारी, समस्या यांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधत लोकशाहीचे महत्त्व सांगितले. ‘लोकशाही टिकून आहे ती भारतीय संविधानामुळेच आणि म्हणून तुम्ही-आम्ही स्वाभिमामाने समाजात जगत आहोत. राज्यघटना सर्वांना समान वागणूक देते. परिवर्तन हे भारतीय राज्यघटनेमुळेच. आजच्या काळात चांगला माणूस म्हणून जगणे खूप कठीण आहे. संविधान समजून घेण्यातच सर्वांचा फायदा आहे. संविधानाची माहिती घेणे म्हणजे राष्ट्रनिर्मितीच्या दिशेन वाटचाल करणे होय,’ असे त्यांनी नमूद केले.

‘लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, याची  जाणीव असणे गरजेचे आहे. सर्व विद्यार्थी संविधान साक्षर झाले पाहिजेत,’ असे आवाहन मडामे यांनी केले.

या वेळी प्रा. सर्जेराव बोराडे, प्रा. बाबूराव जोगदंडे, उर्मिला गोडघाटे, लोकशाही उत्सव समितीचे सदस्य कमलेश जाधव, पत्रकार मिलिंद जाधव उपस्थित होते. उर्मिला गोडघाटे यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link