Next
भिवंडी पंचायत समितीतर्फे फळबाग लागवडीसाठी आवाहन
BOI
Friday, October 26 | 02:10 PM
15 0 0
Share this story

भिवंडी : ‘राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात; मात्र शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहचत नसल्याने ते या योजनांपासून वंचित राहतात. विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी १०० टक्के अनुदान मिळत असून, या योजनेचा भिवंडीतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन भिवंडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अशोक सोनटक्के व पंचायत समितीचे कृषी अधिकारी ए. बी. जैन यांनी केले आहे.

‘या फळबाग लागवड योजनेत शेतकऱ्यांना आंबा व इतर फळझाडे १०० टक्के अनुदानातून घेता येणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये मजूर नोंदणी करून जॉब कार्ड घेणे गरजेचे आहे; सेच शेतकरी अनुसूचित जाती, जमाती किंवा अत्यल्प भूधारक असावा,’ असे कृषी अधिकारी जैन यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link