Next
‘नोव्होटेल’तर्फे मासिकपाळीविषयी जागरूकता उपक्रम
हमजोली फाउंडेशनच्या सहाय्याने महिलांसाठी कार्यशाळा
BOI
Saturday, March 30, 2019 | 05:02 PM
15 0 0
Share this article:

मासिकपाळीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी नोव्होटेल आणि हमजोली फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यशाळेत सहभागी झालेल्या डॉ. सानिया सिद्दिकी यांच्यासह अन्य मान्यवर.

पुणे : महिला, मुलींमध्ये मासिकपाळीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विमाननगर येथील नोव्होटेल हॉटेलने हमजोली फाउंडेशनच्या सहकार्याने नुकतीच एक कार्यशाळा आयोजित केली होती. संस्थेच्या संस्थापक डॉ. सानिया सिद्दिकी, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर महिला, कार्यकर्त्या, महाविद्यालयीन युवती या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. 

मासिकपाळीबाबत स्त्रियांच्या मनात अनेक गैरसमज असतात. भीती, घृणा असते. ते दूर होऊन मासिकपाळीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघता यावे यासाठी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. मासिकपाळी दरम्यान घ्यावयाची स्वच्छता, काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

नोव्होटेलच्या सामाजिक जबाबदारी अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. हमजोली फाउंडेशन ही डॉ. सानिया सिद्दीकी यांनी स्थापन केलेली पुण्यातील स्वयंसेवी संस्था असून, ती महिलांमध्ये मासिकपाळी बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करते. संस्थेतर्फे कार्यशाळा,वैयक्तिक समुपदेशन, सॅनिटरी नॅपकीन वाटप मोहीम अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

या उपक्रमाबाबत नोव्होटेलचे महाव्यवस्थापक नितीन पाठक म्हणाले, ‘मासिकपाळीबाबतचे गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक पाऊल आहे. स्त्री-पुरुष समानता आणायची असेल तर, मुलींना मासिकपाळी विषयी खुलेपणाने बोलता आले पाहिजे. ते त्यांच्या दुबळेपणाचे कारण ठरू नये. यावरून त्यांना दुय्यम वागणूक दिली जाता नये. मासिकपाळी आणि वाढते वय यामुळे मिळणारी भेदभावाची वागणूक हे लिंग समानता प्रस्थापित करण्यातील मोठे आव्हान आहे. महिलांना मासिकपाळीविषयी भीती, घृणा न वाटता, त्याकडे सकारात्मक पद्धतीने बघता आले पाहिजे. या सगळ्या प्रक्रियेत पुरुष महत्त्वाची  भूमिका बजावू शकतात.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search