Next
लीला पूनावाला फाउंडेशनतर्फे ७०२ मुलींना शिष्यवृत्ती
प्रेस रिलीज
Saturday, December 02 | 05:33 PM
15 0 0
Share this story

विद्यार्थीनीला शिष्यवृत्ती प्रदान करताना आयकेईए फाउंडेशनचे सीईओ पेर हेगेन्स आणि लीला पूनावाला
पुणे :  दुर्बल आर्थिक स्थितीमुळे अनेक  हुशार मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत; परंतु लीला पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ)ने अशा मुलींचे शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार केले आहे. नुकत्याच झालेल्या लीला पूनावाला फाऊंडेशन स्कॉलरशिप अॅवॉर्ड कार्यक्रमात  पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या ३७० गरजू आणि हुशार मुलींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.या वेळी  मुख्य अतिथी  तरुण शर्मा (मुख्य कार्यकारी अधिकारी, बीएमसी सॉफ्टवेअर इंडिया),  रजत रहेजा (महाव्यवस्थापक, अॅमडॉक्स इंडिया) आणि पेर हेगेन्स (सीईओ, आयकेईए फाउंडेशन) उपस्थित होते. 

या वर्षी झालेल्या तीन शिष्यवृत्ती सोहळ्यांमध्ये  एकूण ७०२ मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली. यात  डिप्लोमा इन इंजिनिअरींग ४१ , बॅचलर्स इन इंजिनिअरिंग ११३, डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंग२१५, नर्सिंग ११०, फार्मसी ३६, सायन्स ७६ आणि पदव्युत्तर पदवीच्या१११ मुलींचा समावेश आहे.  वर्धा आणि अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये ४७६ मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. 

या वेळी  एलपीएफच्या अध्यक्षा पद्मश्री लीला पूनवाला यांनी पुन्हा एकदा हुंड्याऐवजी मुलींच्या शिक्षणात गुंतवणूक करण्यावर  भर  दिला. त्या म्हणाल्या, ‘प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये सन्माननीय पदांवर काम करणाऱ्या मुली केवळ कंपनीच्या वाढीसाठी योगदान देत नाहीत;तर देशाच्या विकासास हातभार लावतात. सुशिक्षित आणि काम करणाऱ्या मुली त्यांच्या कुटुंबाची मानसिकता बदलू शकतील आणि केवळ कामाच्या ठिकाणीच नाही, तर घरातही समानतेची जाणीव निर्माण करतील अशी मला खात्री आहे’. 

या वेळी डॉ. पूनम पहारी (लिला फेलो १९९६, वैज्ञानिक -बीएआरसी), नीतू भाटिया (लीला फेलो १९९६, अध्यक्ष आणि सीईओ, कयाझोँग डॉट कॉम) आणि मीनल केन (लीला फेलो ९७ 'आणि सहकारी संचालक , कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स)  यांनी आपले विचार व्यक्त केले.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link