Next
विद्यार्थ्यांना सायकल व शालेय साहित्याचे वाटप
प्रेस रिलीज
Wednesday, February 13, 2019 | 12:12 PM
15 0 0
Share this article:पुणे : येथील एस. बालन समूह आणि परिवर्तन संस्था यांच्यातर्फे सातार्‍यातील गरजू विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्या हस्ते सायकल, संगणक, दप्तरांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम सातारा येथील शाहू कला मंदिर येथे आयोजित केला होता.

या वेळी छत्रपती शिवाजी भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, एस. बालन समूहाचे व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन, माणिकचंद ऑक्सिरिचच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल, प्रदीप लोखंडे, जगताप फाउंडेशनचे संतोष जगताप, ‘परिवर्तन’चे विश्वस्त सुधीर धावडे, प्रा. सिकंदर भालदार, जीवन जाधव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या आठ वर्षांपासून एस. बालन समूह व परिवर्तन संस्थेतर्फे सायकल वाटप करण्याचा उपक्रम घेतला जात आहे.

या प्रसंगी बोलताना एस. बालन समूहाचे व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन म्हणाले, ‘जिल्ह्यातील २४ शाळांना ३२५ सायकल्सचे वाटप करण्यात आले असून, २२ शाळांना संगणक संच देण्यात आले आहेत आणि ३५० दप्तरांचे वाटप करण्यात आले. या सायकल्सच्या वाटपाबरोबरच आम्ही सातारा जिल्ह्यामधील आमचा ७०० सायकल्सचा टप्पा पूर्ण केलेला आहे.’

‘रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनी एक मार्च २०१९पासून सातारा जिल्ह्यातील एक हजार ७५८ गावांमध्ये इंद्राणी बालन फाउंडेशनतर्फे ७०० वाचनालये सुरू केली जाणार आहेत; तसेच सातारा ग्रामीण भागात प्रथमच दोन आरोग्य प्रबोधिनी सुरू करण्यात येणार असून, या प्रबोधिनीच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयी शास्त्रीय माहिती आणि मदत पुरवण्यात येणार आहेत. याशिवाय सातार्‍यामधील ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा आणि इतर राज्यस्तरीय परीक्षाची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यासाठी एस. बालन समूहातर्फे सात इंद्राणी बालन महाराष्ट्र शिक्षणकेंद्र आगामी शैक्षणिक वर्षामध्ये लवकरच सुरू केली जाणार आहेत.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जगताप यांनी केले आणि विपुल धनगर यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search