Next
सिंधी समाज वधू-वर मेळाव्याचे रविवारी आयोजन
BOI
Monday, March 04, 2019 | 12:36 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘सिंधू सेवा दल आणि भारतीय सिंधू सभा यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधी समाजातील विवाहेच्छूकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १७ मार्च २०१९ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० या वेळेत कॅम्प परिसरातील अल्पबचत भवन येथे हा वधू-वर मेळावा होणार आहे,’ अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष दीपक वाधवानी व भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष ज्ञान पंजाबी यांनी दिली. सचिन तलरेजा, विजय दासवानी, सुरेश जेठवानी, परमानंद भटिजा, पुरुषोत्तम परयानी, रेश्मा खियानी आदी उपस्थित होते.

‘एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारा हा सिंधी समाजाचा पाचवा वधू-वर मेळावा असून, त्यासाठी देशभरातून सिंधी समाजातील विवाहेच्छूकांचा या प्रतिसाद मिळतो. समाजातील इच्छूक तरुण-तरुणींना एकमेकांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, परस्पर परिचय वाढावा व विवाहाच्या निर्णयप्रक्रियेला गती मिळावी, या उद्देशाने हा मेळावा आयोजिला जातो. या मेळाव्यासाठी इच्छूकांनी १० मार्च २०१९ पर्यंत बायोडेटा, फोटो व कुंडली देणे आवश्यक आहे. या मेळाव्याच्या नावनोंदणीसाठी सिंधू सेवा दल (०२०-२६३३३१५९), भारतीय सिंधू सभा (०२०-२६१४०४६६) येथे संपर्क साधावा,’ असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी 

सिंधी समाजाचा वधू-वर मेळावा
स्थळ : अल्पबचत भवन, कॅम्प, पुणे.
दिवस व वेळ : रविवार, १७ मार्च २०१९, सकाळी ९.३० ते ४.३० 

नावनोंदणीसाठी : सिंधू सेवा दल : (०२०) २६३३३१५९ ,
                           भारतीय सिंधू सभा  (०२०) २६१४०४६६ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna gramopadhye About 165 Days ago
Best. Wishes. Bal. g
0
0
Balkrishna gramopaDhye About 165 Days ago
Hpoe , this become a regular
0
0
Balkrishna gramopadhyeGr About 165 Days ago
Good Idea . May others follown
0
0

Select Language
Share Link
 
Search