Next
ताज हॉटेलचे पुण्यातील नवीन महाव्यवस्थापक
प्रेस रिलीज
Friday, February 09 | 11:42 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘ताज हॉटेल पॅलेसेस रिझॉर्ट सफारीज’ने सहा फेब्रुवारी रोजी आपल्या पुण्यातील हॉटेल्ससाठी काही नवीन नियुक्त्यांची घोषणा केली आहे. सुजु कृष्णन ताज ब्ल्यू डायमंडच्या विवांताची सूत्रे हाती घेतील, तर जयंत दास पुण्यातील हिंजवडी येथील गेटवे हॉटेलची जबाबदारी सांभाळतील.

सुजु हे कंपनीत २४ वर्षांपासून कार्यरत असलेले ताजचे निष्ठावंत कर्मचारी आहेत. पुण्यात येण्यापूर्वी ते एर्नाकुलमच्या मरिन ड्राइव्हवरील गेटवे हॉटेलचे महाव्यवस्थापक होते.
‘पुण्यासारख्या उत्साही शहरातील ताज ब्ल्यू डायमंडच्या विवांतामध्ये एक नवीन खेळी सुरू करण्याबाबत मी खूपच उत्सुक आहे. सर्वोत्कृष्ट सेवेचा ताजचा वारसा पुढे चालवायला मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे,’ असे सुजु कृष्णन म्हणाले.

जयंत दास यापूर्वी केरळमधील अथ्थे ताज कुमारकोम रिझॉर्ट आणि स्पाचे महाव्यवस्थापक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली या हॉटेलने दोन राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्राप्त केले आहेत. 
‘हिंजवडीच्या गेटवे हॉटेलमधील तरुण व प्रतिभावान कर्मचाऱ्यांसोबत काम सुरू करून, आमच्या पाहुण्यांना ताज ब्रँडची ओळख असलेली उच्च स्तरावरील सेवा देण्यास मी उत्सुक आहे,’ असे जयंत दास म्हणाले. 

‘सुजु यांनी ताजमध्ये स्वत:ला सिद्ध केलेले आहे. टाटा समूह युवा व्यवस्थापक नेतृत्व कार्यक्रमासाठी त्यांना नामांकन मिळाले होते. त्यांनी अनेक ठिकाणी यशस्वी नेतृत्व केले आहे आणि ते निकालावर (रिझल्ट) लक्ष केंद्रित करणारे व्यावसायिक आहेत. जयंत दास यांनीही समुहात अनेक आव्हानात्मक कामे हातात घेतली आहे आणि त्यातील बहुतेक यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. ते अत्यंत परिपक्व आणि मेहनती आहेत. मी या दोघांनाही पुण्यातील त्यांच्या नवीन कामासाठी शुभेच्छा देतो,’ असे ताज हॉटेल पॅलेसेस रिझॉर्ट सफारीजचे पश्चिम विभागाचे वरीष्ठ उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) फरहात जमाल म्हणाले.

दोन्ही ताज हॉटेलांमधील पाहुणे पुणे शहराचा दिमाख अनुभवू शकतील. ताज-ब्ल्यू डायमंडचे विवांता पुण्याच्या हृदयस्थानी आणि व्यावसायिक तसेच मनोरंजन क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे. तर हिंजवडी येथील गेटवे हॉटेल हे पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या केंद्राजवळ तसेच पुणे-मुंबई महामार्गालगत, अत्यंत सोयीस्कर ठिकाणी आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link