Next
कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अपंग युवकांचा गौरव
प्रेस रिलीज
Tuesday, July 31, 2018 | 03:17 PM
15 0 0
Share this article:

कौशल्य प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या अपंग तरुणांना ‘अमेरिकन इंडिया फाउंडेशन’तर्फे अपंग पुनर्वसन विभागाचे आयुक्त रुचेश जयवंशी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

मुंबई  : ‘अॅबिलिटी बेस्ड लाईव्हलीहूड एम्पॉवरमेंट’ (एबल) हे कौशल्य प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या १०७ अपंग तरुणांना ‘अमेरिकन इंडिया फाउंडेशन’तर्फे (एआयएफ) गौरवण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे अपंग पुनर्वसन विभागाचे आयुक्त रुचेश जयवंशी(आयएएस) यांच्या हस्ते या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे देण्यात आली. या अंध व अपंग युवकांनी रिटेल हॉस्पिटॅलिटी व फिजिओथेरपी क्षेत्रात प्रशिक्षण मिळवले आहे. 

मुंबई येथील एनएबी आणि शेशायर होम्स या ‘एआयएफ’शी संलग्न असलेल्या संस्थांनी या युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले. भारतातील अपंग व्यक्तींना रोजगार मिळवून देणे, समाजात मोकळेपणाने वावरण्यास त्यांना व समाजालाही प्रोत्साहित करणे यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम अमेरिकेतील तारसाडिया फाउंडेशनच्या सहाय्याने चालविला जातो. 

या गौरव समारंभाला ‘ फ्रॅंकलिन टेम्प्लटन इन्व्हेस्टमेंट्स’चे एव्हीपी संजॉय दत्त आणि ‘एआयएफ’चे  कार्यक्रम विभागाचे साजित मेनन हे उपस्थित होते. या वेळी युवकांचे पालक आणि रोजगार देणारे अधिकारी यांनी आपले अनुभव कथन केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search