Next
‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन
प्रेस रिलीज
Friday, December 22 | 12:17 PM
15 0 0
Share this story

पुणे : सुरतवाला फाउंडेशनतर्फे रसिक मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला लिखित ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन २२ डिसेंबरला करण्यात आले आहे.
 
महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंपकलाल सुरतवाला भूषविणार आहेत. सुरेशचंद्र सुरतवाला यांनी त्यांच्या आई वडिलांची कथा या पुस्तकाद्वारे मांडली आहे.

या कार्यक्रमादरम्यान ‘रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट’ व ‘सुरतवाला फाउंडेशन’तर्फे चार लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप होणार आहे. ही शिष्यवृत्ती शहरी आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थीनींना मिळून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी देण्यात येते. या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे.

या प्रसंगी नटवरलाल सुरतवाला, बळवंत जमनादास गांधी, शांतीलाल बाबुभाई सुरतवाला, दिनेश हरिलाल सुरतवाला, जतीन धनसुखलाल सुरतवाला, जगमोहन रंगीलदास सुरतवाला (रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट) उपस्थित राहणार आहेत.

पुस्तक प्रकाशन समारंभाविषयी :
दिवस : शुक्रवार, २२ डिसेंबर २०१७
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : पत्रकार भवन, पुणे 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link