Next
केशवसुत
BOI
Thursday, March 15 | 03:45 AM
15 0 0
Share this story

नाही चैन तुला मुळी पडत ना माझ्याविना मत्प्रिये? तुते आठविल्याविना दिवसही माझा न जाई सये! केव्हा येतिल ती दिने न करण्या ताटातुटी आपुली? केव्हा त्या रजनी? जयांत विसरू मी-तूपणाला मुळी!’ असं म्हणणारे केशवसुत ऊर्फ कृष्णाजी केशव दामले यांचा १५ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी! 
.................
१५ मार्च १८६६ रोजी मालगुंडमध्ये जन्मलेले कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत म्हणजे ‘आधुनिक मराठी कवितेचा जनक’ ज्यांना मानलं गेलं असे थोर कवी! मराठी कवितेच्या नव्या युगाचं त्यांच्याकडे नेतृत्व होतं.
 
त्यांची कविता ही आत्माविष्कारी (वैयक्तिक स्वरूपाची) तसंच दार्शनिक होती. सौंदर्यवादी दृष्टिकोन त्यांनीच सर्वप्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात आणला. इंग्लिश काव्यामधला चौदा ओळींचा ‘सॉनेट’ हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत आणून लोकप्रिय केला.  

‘शिखरिणी’, ‘शार्दूलविक्रीडित’ अशा वृत्तांचा वापर करून त्यांनी  वृत्तबद्ध कविता केल्या. त्यांच्या कवितांमधून एकीकडे सृष्टीतत्त्वाचं दर्शन घडतं, तर दुसरीकडे प्रेम आणि शृंगाराचं! गणपतीपुळ्याजवळच्या मालगुंड या त्यांच्या जन्मगावी कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे यथोचित स्मारक करण्यात आलं आहे. सात नोव्हेंबर १९०५ रोजी त्यांचं निधन झालं.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
(केशवसुतांच्या जन्मस्थळी पत्रकार अभिजित नांदगावकर यांनी मराठी राजभाषादिनानिमित्त सादर केलेल्या ‘तुतारी या कवितेचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)(आधुनिक मराठी कवितेचे जनक अशी ओळख असलेल्या केशवसुत यांच्या मालगुंड या जन्मस्थळी असलेल्या स्मारकाची भेट घडविणारा हा व्हिडिओ.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link