Next
डीकेटीई देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित
प्रेस रिलीज
Tuesday, December 12 | 05:46 PM
15 0 0
Share this story

डीकेटीईचे संस्थेचे अध्यक्ष आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व विश्‍वस्त यांचे मार्गदर्शन मिळाले. इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डे. डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,इचलकरंजी : ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई, दिल्ली) व कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘इंडस्ट्री- लिंकड् टेक्निकल इन्स्टिटयूट्स २०१७’ या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरींग इन्स्टिट्यूटला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.

विनाअनुदानित तत्त्वावर चालणारी डीकेटीई सातत्याने पाच वर्षे या सर्वेक्षणामध्ये सहभागी होणारी, प्रत्येक वेळेस पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळविणारी आणि सन २०१५ व सन २०१७ मध्ये  हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारी ही महाराष्ट्रातील एकमेव इन्स्टिट्यूट आहे. दिल्ली येथे झालेल्या सातव्या ‘ग्लोबल युनिव्हर्सिटी-इंडस्ट्री काँग्रेसः ग्लोबल हायर एज्युकेशन समेट २०१७’ या परिषदेत हा पुरस्कार इन्स्टिट्यूटला मिळाला.

सेक्रेटरी, डीपार्टमेंट ऑफ सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी, भारत सरकारचे आशुतोष शर्मा, ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे, ‘सीआयआय’, नॅशनल कमिटी ऑन हायर एज्युकेशनचे चेअरमन विजय थंडानी व कॅडीलाचे देव मुखर्जी यांच्या हस्ते इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रारंभी संक्षिप्त सर्वेक्षणात देशातील तब्बल ९ हजार ५२४ महाविद्यालये सहभागी झाली होती. त्यापैकी नामांकित ४ हजार ७९० महाविद्यालये सखोल सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी पात्र ठरली. विविधांगी मुद्द्यावर पडताळणीनंतर १३० इन्स्टिट्यूट सखोल सर्वेक्षणामधून पात्र ठरले व त्यामधून ६५ महाविद्यालये पुढील परिक्षणासाठी निवडली. अंतिमतः एकूण २२ कॉलेजसचे अतिशय विस्तृतपणे विविध मुद्द्यांवर सर्वेक्षण केले. यात उद्योगाला पुरक असे अद्ययावत शिक्षण, इंडस्ट्री सर्व्हिसेस, कन्सल्टंसी, प्राध्यापक व विद्यार्थी गुणोत्तर, इंडस्ट्री इन्स्टिट्यूटशी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय करार, संशोधन, अभ्यासक्रम, प्रशिक्षण, प्लेसमेंट, उद्योग जगताशी असलेल्या बहुआयामी संबंधाचे विश्‍लेषण अशा विविध मुद्द्यांचा विचार झाला.

या सर्व बाबींची सर्वांगाने सखोल पडताळणी केल्यानंतर डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँड इंजिनिअरींग इन्स्टिट्यूटला प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले. हे सर्वेक्षण पारदर्शी पद्धतीने विविध टप्प्यांमध्ये झाले. दिल्ली येथील शिष्टमंडळ व निवडलेल्या इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांशी इंटरअ‍ॅक्शन झाले. शिष्टमंडळामध्ये दिल्लीच्या जीजीएस इंद्रप्रस्थ विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर प्रा. के. के. अग्रवाल, दिल्ली युनिर्व्हर्सिटीचे फॉरमर हेड अँड डीन प्रा. जे. के. मित्रा, चान्सलर ईमेरिटस प्रा. डॉ. राजू चंद्रशेखर, ‘एमएनआयटी’चे (जयपूर) डायरेक्टर प्रा. उदयकुमार यरगट्टी या अधिकाऱ्यांचा यात सहभाग होता.

‘डीकेटीईमध्ये विद्यार्थ्यांना संशोधनात्मक कार्य करण्यासाठी उपलब्ध ५० कोटींची उपकरणे, इंडस्ट्रीजशी व माजी विद्यार्थी यांच्याशी असलेले उत्तम इंटरअ‍ॅक्शन, विद्यार्थी कल्याणासाठी केलेले विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्याशी शैक्षणिक व औद्योगिक सामंजस्य करार, आयोजित सेमिनार, वर्कशॉप व कॉन्फरन्स तसेच गेली ३५ वर्षे सातत्याने टेक्स्टाईल विभागामध्ये होत असलेल्या १०० टक्के प्लेसमेंटमुळे ते प्रभावीत झाले’, असे एआयसीटीई  सीआयआयच्या प्रसिध्द केलेल्या मॅगेझीनमध्ये नमूद केले.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, ‘१९८२ साली डिप्लोमा कोर्ससह स्थापन झालेली डीकेटीई संस्था आज जागतिक पातळीवर अनेक शिखरे सर करत आहे. अव्वल गुणवत्ता, सर्वोत्तम सुविधा आणि तडजोडविरहीत दर्जा याचा डीकेटीईने सदैव ध्यास घेतला आहे. नवनवे उपक्रम, नवनवे अभ्यासक्रम आणि अव्वल गुणवत्तेचा आग्रह धरत अनेक यशोशिखरे या महाविद्यालयाने व येथील विद्यार्थ्यांनी सर केली आहेत.’

माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, ‘देशामध्ये डीकेटीई या सर्वेक्षणामध्ये सर्वामध्ये अग्रेसर राहिली हे कौतुकास पात्र आहे. डीकेटीईने इंडस्ट्रीजच्या विकासासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचे करार केलेले आहेत. त्यामध्ये संयुक्तपणे पेटेंट तयार करणे, संयुक्तपणे संशोधनात्मक कार्य करणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. डीकेटीईचे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय इंडस्ट्रीजशी असलेले इंटरअ‍ॅक्शन हे अद्वितीय असेच आहे व त्यामुळेच डीकेटीई, इचलकरंजी ही देशामध्ये अव्वल राहिली.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link