Next
सेरेब्रल पाल्सीबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन
फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनतर्फे ‘सीएमई’चे आयोजन
BOI
Tuesday, September 04, 2018 | 03:04 PM
15 0 0
Share this article:

कार्यशाळेचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण. शेजारी डॉ. प्रवीण मुंढे, एस. एस. मठ, डॉ. परकार, डॉ. संदीप पटवर्धन, डॉ. पराग पाथरे, डॉ. अनिरुद्ध आठल्ये व तानाजी काकडे

रत्नागिरी :
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच ‘आयएमए, रत्नागिरी’ यांच्या सहयोगाने रत्नागिरीमध्ये प्रथमच ‘कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन’चे (सीएमई) आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर्सनी या वेळी सेरेब्रल पाल्सी या विकाराबद्दल बहुमूल्य मार्गदर्शन केले.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन नोव्हेंबर २०१५पासून सेरेब्रल पाल्सीग्रस्त रुग्णांना चाचणी, फिजिओथेरपी, वाचाथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि शस्त्रक्रिया यांच्या माध्यमातून आधार देत आहेत. याचाच पुढील भाग म्हणून रत्नागिरीतील फिनोलेक्स गेस्ट हाउसच्या सभागृहात ‘सीएमई’चे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थित डॉक्टर्स

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, संचेती हॉस्पिटलचे पेडिअॅट्रिक ऑर्थोपेडिक प्रमुख डॉ. संदीप पटवर्धन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फुले, ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. पराग पाथरे, डॉ. अलिमियाँ परकार, फिनोलेक्सचे कार्यकारी संचालक संजय मठ उपस्थित होते. स्वतः सेरेब्रल पाल्सीग्रस्त असलेल्या हितेश रामचंदानी यांनीही या वेळी प्रोत्साहनपर भाषण केले.

डॉक्टरांना मार्गदर्शन करताना संचेती हॉस्पिटलचे डॉ. संदीप पटवर्धन

सेरेब्रल पाल्सीचे खूप आधी निदान होणे, तसेच विशेष डॉक्टरांकडे त्यावरच्या उपचाराची सुरुवात होणे किती महत्त्वाचे आहे, याची जागृती हा ‘सीएमई’चा उद्देश होता. सेरेब्रल पाल्सीग्रस्त रुग्णांना वाढीदरम्यान येणाऱ्या अडचणी, बौद्धिक व्यवस्थापन, शस्त्रक्रियेचे विविध पर्याय आणि सेरेब्रल पाल्सी रुग्णांच्या उपचारांसाठी रत्नागिरी आयएमए आणि सरकारी यंत्रणा कशा पद्धतीने सहकार्य करू शकते, याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली.

सेरेब्रल पाल्सीचा रुग्ण त्वरित ओळखून त्यावर उपचार सुरू व्हावेत; या रुग्णांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि असे रुग्ण निर्माण होणार नाहीत, याकरिता गरोदर महिलांना मार्गदर्शन आणि जन्मलेल्या बाळांवर कटाक्षाने बारीक लक्ष दिले पाहिजे. यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनने (एमएमएफ) पुढाकार घेतला आहे. बाळाच्या जन्मानंतर त्याची हालचाल, सुधारणा याचा छोटा व्हिडिओ करूनही मार्गदर्शन घेता येणार आहे. सेरेब्रल पाल्सीतून मुक्ततेसाठी सर्वांच्या सहकार्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली.

या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, ‘रत्नागिरी जिल्हा ज्यात मागे आहे, त्यात पुढे जाण्यासाठी कंपन्यांनी सीएसआर निधीची मदत करावी. सेरेब्रल पाल्सीमुक्त रत्नागिरीसाठी शासनाच्या माध्यमातून मदत करू. शेतीला पाणी देणाऱ्या फिनोलेक्स पाइपलाइनप्रमाणे सेरेब्रल पाल्सीवर मात करण्यासाठी ही आरोग्याची पाइपलाइन आहे. फिनोलेक्सने उभारलेले भौतिक उपचार केंद्र व भविष्यात आणखी अशी उपचार केंद्रे, पुनर्वसन केंद्रे सुरू होण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जातील.’

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले, ‘सेरेब्रल पाल्सीमुळे रुग्ण स्वावलंबी होऊ शकत नाही; पण अशा रुग्णांना स्वतःच्या पायावर उभे करायला फिनोलेक्सचे सहकार्य मिळणे ही कौतुकास्पद गोष्ट आहे.’ 

मॅनेजर (एचआर) तानाजी काकडे यांनी मार्गदर्शक डॉक्टर लीना श्रीवास्तव, डॉ. रिमा नागपाल, डॉ. अभिजित बोत्रे, डॉ. नीलेश कुरावळे, डॉ. सलोनी राजे यांचा सत्कार केला.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनतर्फे सेरेब्रल पाल्सीग्रस्त रुग्णांसाठी भौतिक उपचार केंद्र चालवण्यात येते. या केंद्रात रुग्ण व नातेवाईकांची माहिती घेताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, एस. एस. मठ, तानाजी काकडे.

रत्नागिरी जिल्ह्यात ‘सीपी’चे २३७ रुग्ण
गेल्या वर्षी फिनोलेक्सने रत्नागिरी जिल्ह्यात सेरेब्रल पाल्सीचे (सीपी) २३७ रुग्ण शोधले. त्यानंतर फिनोलेक्स गेस्ट हाउस आणि डेरवणला भौतिक पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले. त्यात आतापर्यंत ५४३२ सेशन्समधून उपचार करण्यात आले. फिनोलेक्स इंडस्ट्रीजतर्फे अशी केंद्रे सातारा, वाई, पाचगणी, पाटण येथेही सुरू आहेत.

या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी भौतिक उपचार केंद्राला भेट दिली. तिथे कशा प्रकारे उपचार केले जातात, तसेच उपचारांसाठी आवश्यक साधनसामग्री कोणती असते, ते पाहिले. तसेच उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांकडून त्यांनी माहिती घेतली. भाट्ये, सोमेश्वर येथील काही रुग्णांच्या पालकांनी पहिल्यापेक्षा आपल्या मुलांमध्ये खूप बदल झाल्याचे दिसत असल्याचे सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मकरंद About
फिनाेेलेक्स कंपनीचा हा उपक्रम स्तुत्य अाहे. रत्नागिरीतील कंपन्यांनी फिनाेलक्सचा अादर्श घ्यावा. यातून रत्नागिरीतील समस्या साेडवणे शक्य अाहे. फिनाेलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनला भविष्यातील समाजाेपयाेगी कामासाठी हार्दिक शुभेच्छा
0
0

Select Language
Share Link
 
Search