Next
‘सामर्थ्य प्रबोधिनी’तर्फे सारसबाग स्वच्छता अभियान
प्रेस रिलीज
Monday, November 12, 2018 | 01:49 PM
15 0 0
Share this article:



पुणे : येथील सामर्थ्य प्रबोधिनीतर्फे सारसबाग स्वच्छता अभियान अलीकडेच राबविण्यात आले. हे या अभियानाचे तिसरे वर्ष होते.

दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून हजारो पुणेकरांनी एकत्र येत सारसबागेत दिवाळी पाडवा पहाट साजरी केली. या वेळी शेकडो दिवे आकाशात सोडण्यात आले होते. यामध्ये चीनी आकाश दिव्यांचा समावेश होता. कार्यक्रमानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा झाला होता. हा परिसर सामर्थ्य प्रबोधिनीतर्फे स्वच्छ करण्यात आला.

‘हा कचरा पूर्णपणे संपवत नाही, तोपर्यंत आम्ही हे कार्य सुरूच ठेवणार. सुजाण पुणेकर पुढील वर्षी याचा नक्की विचार करतील. या स्वच्छता अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेल्या तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय होती, हे  उल्लेखनीय आहे,’ असे सामर्थ्य प्रबोधिनीकडून सांगण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष सुशांत भिसे म्हणाले, ‘हा कचरा सुशिक्षित पुणेकरांचा आहे व बागेमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे होत आहे. पुढील वर्षी असे सांस्कृतिक कार्यक्रम रोखण्यासाठी आम्ही प्रयन्तशील असून, पर्यावरण आणि लॉनची होणारी नासाडी रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रसंगी प्रशासन विविध सामाजिक संस्था आणि संघटनांची मदत घेतली जाईल.’

या वेळी संस्थेचे संतोष चौधरी, स्वप्नील नहार, जयराज भिसे, सुशील भूमकर, मंगेश थोरात, अजय मापरे, मंगेश साळेकर, रोहित परदेशी, सौरभ कापसे, कादंबरी आंग्रे, ऋषिकेश कसाब, रोहित केदारी, कैलास हिंगे, परेश बलकवडे, महेश साठे, सुरज घाणेकर, पंकज गोरखे आदी सदस्य उपस्थित होते.

या वेळी सर्व सदस्यांनी पुढील वर्षी चिनी आकाश दिव्यांविरुद्ध प्रबोधन आणि प्रशासकीय यंत्रणांना आव्हान करून बाजारपेठेतील चिनी आकाश दिव्यांवर टाच आणण्याचा निर्णय घेतला असून, त्यादृष्टीने विविध मार्गांनी जनजागृती करण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search