Next
‘आजच्या पिढीलाही ‘पुलं’ भावतात’
BOI
Thursday, November 09 | 07:45 PM
15 0 0
Share this story


‘स्वतःवर विनोद करणं, हे ‘पुलं’चं वैशिष्ट्य आहे आणि आजच्या काळात ते अधिक जाणवतं. झऱ्याच्या पाण्यासारखा खळाळता विनोद ते करतात. माझ्या लेखनावर त्यांचा प्रभाव आहे. आजच्या पिढीलासुद्धा ‘पुलं’ तितकेच भावतात,’ अशी भावना ‘व्यक्ती आणि वल्ली’मध्ये भूमिका साकारणारे अभिनेते समीर चौगुले यांनी ‘पुलं’च्या जयंतीनिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’कडे व्यक्त केली. 

समीर चौगुले म्हणजे संतोष पवार यांच्या ‘यदा कदाचित’ नाटकातल्या अर्जुनाच्या धमाल भूमिकेत प्रेक्षकांना हसून लोळवणारा, त्यानंतर ‘श्री बाई समर्थ,’ ‘असा मी असामी’ गाजवून आता ‘कॉमेडीची जीएसटी एक्स्प्रेस’मधून अभिनयाबरोबरच आपल्या लेखनाची जादू दाखवणारा तरुण रंगकर्मी. 

(प्रतिनिधी : प्रसन्न पेठे, स्नेहा कोंडलकर)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link