Next
राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत गणेशगुळ्याचा संघ विजेता
BOI
Thursday, March 07, 2019 | 01:00 PM
15 0 0
Share this story



रत्नागिरी : कल्याण ब्राह्मण सभा संघातर्फे कै. अरुण काणे स्मृती क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील वीर सावरकर संघाने अलिबाग-पेण संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. २१ हजार रुपये व चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अंतिम सामन्यात सामनावीर व मालिकावीराचा मान वीर सावरकर संघाचा कप्तान सौरभ फडके याने पटकावला.

कल्याण येथील सुभाष मैदानात या स्पर्धा झाल्या. यात राज्यभरातून १६ संघ सहभागी झाले होते. वीर सावरकर संघात सौरभ फडके, गौरव फडके, गणेश फडके, केदार पटवर्धन, नीलेश पटवर्धन, शशांक पटवर्धन, विभव पटवर्धन, संकेत पटवर्धन, सागर पटवर्धन, भूषण जोशी, जयेश भावे, दीपक पळसुलेदेसाई, प्रशांत फडके, आदित्य फडके या खेळाडूंचा समावेश होता.

सौरभ फडकेला गणपती वैद्य, शरदचंद्र ओक स्मृतीप्रित्यर्थ पारितोषिके मिळाली. वीर सावरकर संघाचे सौरभ फडके, गणेश फडके, कल्याणच्या परशुराम संघाचा खेळाडू ऋतुराज फडके, सागर गोठोस्कर सामन्याचे आकर्षण ठरले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी रणजी क्रिकेटपटू नंदन फडणीस, आमदार नरेंद्र पवार, कॅरमपटू सोनम लेले-कुर्लेकर, सुधीर काणे, सायली केणे माजी आमदार प्रभाकर संत, विनायक मालशे, अरविंद वैद्य, आशिष गोळे, अमित धाक्रस, उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link