Next
डॉ. गाडगीळ सात ऑगस्टला ‘मसाप गप्पा’मध्ये
BOI
Sunday, July 29, 2018 | 10:15 AM
15 0 0
Share this article:

पुणे : आपल्या सोप्या आणि सहजसुंदर शैलीतून विज्ञानविषयक लेखन करणारे प्रसिद्ध लेखक आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सात ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.

त्यांच्याशी पर्यावरण अभ्यासक डॉ. वर्षा गजेंद्रगडकर संवाद साधणार आहेत. या वेळी ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
मंगळवार, सात ऑगस्ट २०१८
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search