Next
‘अभियंत्यांनी सोशल इंजिनीअरिंग शिकावे’
पुणे महापालिका अभियंता संघातर्फे गुणवंतांचा सत्कार
प्रेस रिलीज
Friday, November 02, 2018 | 03:18 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘शहराच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. पाण्याचे वाटप, रस्त्यांचे नियोजन, देखण्या इमारती आणि इतर अनेक गोष्टींचे ते शिल्पकार असतात; मात्र, बऱ्याचदा विभागांतर्गत समन्वयाचा अभाव दिसतो. परिणामी कामांना विलंब होतो. त्यामुळे अभियंत्यांनी नवनिर्मितीबरोबरच ‘सोशल इंजिनीअरिंग’ शिकावे व अधिकारी-अभियंत्यांनी एकदिलाने काम करावे,’ असे प्रतिपादन पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी केले.

पुणे महानगर पालिका अभियंता संघातर्फे राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त वानिवृत्त अभियंत्यांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात आयोजित केला होता. त्या वेळी निंबाळकर बोलत होते. या प्रसंगी मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर, सुनील कदम, शिवाजी लंके, सतीश भोसरेकर, वसंत पाटील, प्रदीप बेलदार, अभियंता मित्र मासिकाचे संपादक कमलकांत वडेलकर, नरेंद्र वाघ, संजय पोळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पुणे महापालिका अभियंता संघातर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात डावीकडून सुनील कदम, शिवाजी लंके, कमलकांत वडेलकर, सतीश भोसरेकर, वसंत पाटील, प्रदीप बेलदार, प्रशांत वाघमारे, राजेंद्र निंबाळकर, अनिरुद्ध  पावसकर, नरेंद्र वाघ व संजय पोळ.

निंबाळकर म्हणाले, ‘प्रत्येक कामात सुधारणेला वाव असतो. टीका होत राहणार आहे. त्यामुळे निराश न होता त्यात सुधारणा करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कामावर प्रेम असावे. ‘कॅपॅसिटी बिल्डिंग’ वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. आवश्यक तेथेच सल्लागाराची मदत घ्यावी. आपल्या कौशल्याचा योग्य उपयोग होईल, याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी अंतर्गत संवाद गरजेचा असून, स्वतःवर विश्वास असावा.’

करंदीकर म्हणाले, ‘नकारात्मक गोष्टीवर प्रहार करून त्याला सकारात्मक करण्यासाठी माध्यमे प्रयत्न करत असतात. चांगल्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत. अभियंता शहराचा शिल्पकार असतो. भविष्यातील समस्या लक्षात घेऊन आपण तसे नियोजन केले पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला आपण चांगले केले हे दाखवता आले पाहिजे. अभियंता कारकून होऊ नये, यासाठी अभियंता संघाने पुढाकार घेऊन कॅपॅसिटी बिल्डिंग करावी.’

सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. सिमरन पिरजादे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link