Next
रत्नागिरीत १४ ऑगस्टला ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ उपक्रमाचा आरंभ
BOI
Friday, August 10, 2018 | 02:01 PM
15 1 0
Share this story

कीर्तनकार दाम्पत्य - श्रेयस आणि मानसी बडवेरत्नागिरी :  क्रांतिवीर, स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांची सत्ता उलथवून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणत्या हालअपेष्टा सहन केल्या, हे आताच्या युवा पिढीला कळणे आवश्यक आहे. त्यांच्या योगदानाला स्मरणपूर्वक अभिवादन करण्यासाठी चतुरंग प्रतिष्ठान आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने ‘स्वातंत्र्याचे पूर्वरंग’ हा नवा उपक्रम सुरू करायचे ठरवले आहे. त्याअंतर्गत मंगळवारी, १४ ऑगस्ट २०१८ रोजी रात्री १० वाजता कीर्तन जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील शेरे नाक्यावरील माधवराव मुळे भवनातील पांडुरंग जगन्नाथ वैद्य सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील मंडळींनी केलेल्या क्रांतिकार्याचे, त्यासाठी त्यांनी बलिदान करून पत्करलेल्या हौतात्म्याचे स्मरण करून द्यावे व त्यांच्या३ योगदानाला स्मरणपूर्वक अभिवादन करण्याच्या हेतूने हा उपक्रम योजला आहे. यात वेगवेगळ्या स्वातंत्र्यवीरांचे, क्रांतिवीरांचे जीवनदर्शन, कधी व्याख्यान, कधी कीर्तन, कधी प्रवचन अशा माध्यमातून घडविण्याचा चतुरंग प्रतिष्ठानचा मानस आहे.

‘की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने’ ही स्वातंत्र्यवीर-क्रांतिवीर-लोकमान्य व्यक्तिरेखांचा जीवनपट मांडणारी अनोखी अशी कीर्तन जुगलबंदी शुभारंभाच्या कार्यक्रमात रंगणार आहे. श्रेयस बडवे व मानसी बडवे हे तरुण कीर्तनकार दाम्पत्य जुगलबंदी साकारणार आहे. 

कीर्तन जुगलबंदी 
दिवस : १४ ऑगस्ट २०१८
वेळ : रात्री १० वाजता
स्थळ : पांडुरंग जगन्नाथ वैद्य सभागृह, माधवराव मुळ्ये भवन, शेरे नाका, रत्नागिरी. 
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link