मुंबई : कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्सने पेमेंटच्या अटींमध्ये लवचिकता असलेला व जीवन संरक्षण देणारा ‘टायटॅनिअम प्लस प्लान’ हा नवा युनिट लिंक्ड नॉन पार्टिसिपेटिंग लाइफ इन्शुरन्स प्लान जाहीर केला आहे. योजनाधारकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास हा प्लान त्याच्या कुटुंबाला आयुर्विमा कवच देतो. पोर्टफोलिओ व्यवस्थापनाचे निरनिराळे पर्याय व लवचिकता यांची उत्तम सांगड घातली असल्याने हे उत्पादन बचतीवर संपूर्ण नियंत्रण देऊ करते.
गरजेनुसार कवच उपलब्ध, तसेच ग्राहकांना योजनेच्या कालावधीत संरक्षणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी जीवन कवच कमी किंवा अधिक करण्याचा पर्याय आहे. ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार प्रीमिअम भरण्याच्या अटी अगोदर ठरवून घेता येऊ शकतात. रिटर्न प्रोटेक्टर ऑप्शन, सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर ऑप्शन, ऑटो फंड रिबॅलन्सिंग व सेफ्टी स्विच ऑप्शन अशा विविध पोर्टफोलिओ व्यवस्थापन पर्यायांमुळे ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीचे अधिक चांगले व्यवस्थापन करता येईल. सिस्टिमॅटिक ट्रान्स्फर ऑप्शन सिंगल पे ऑप्शनबरोबरही उपलब्ध आहे. बचतीमध्ये वाढ करण्यासाठी योजनेच्या कालावधीत युनिट अलोकेशनबरोबरच अतिरिक्त लॉयल्टीचा समावेश व वेल्थ बूस्टर्स, हा प्लान ग्राहकांसाठी एमडब्लूपीएच्या (मॅरिड विमेन्स प्रॉपर्टी अॅक्ट) दृष्टीने अतिशय साजेसा आहे, ही या प्लान ही ठळक वैशिष्ट्ये आहेत.
कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज माथुर यांनी सांगितले, ‘विमा उत्पादन तयार करत असताना ग्राहकांच्या गरजा व दीर्घकाळात मूल्यनिर्मिती अतिशय महत्त्वाची असते, असे आम्हाला वाटते आणि प्रत्येक उत्पादनाच्या बाबतीत आमचे हेच उद्दिष्ट असते. ग्राहकांच्या गरजांवर प्रामुख्याने भर देऊन, तसेच या गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये व पर्याय समाविष्ट करून ‘टायटॅनिअम प्लस प्लान’ दाखल करण्यात आला आहे. हा प्लान जीवन संरक्षण व बचत असा दुहेरी फायदा देतो. संपत्तीचे व्यवस्थापन व संचय करण्यासाठी ग्राहकांना विविध गुंतवणूक व्यवस्थापन पर्यायांतून सर्वाधिक उपयुक्त पर्याय निवडता येऊ शकतो.’
‘टायटॅनिअम प्लस प्लान’साठी एंट्री एज कमीत कमी शून्य वर्षे आहे व जास्तीत जास्त ७० वर्षांपर्यंत आहे, तर योजनेची मुदतपूर्ती वयाची १८ ते ८० वर्षे या दरम्यान आहे. ग्राहकांच्या गरजांनुसार प्रीमिअम भरण्याचे सिंगल, लिमिटेड व रेग्युलर पे असे पर्याय उपलब्ध आहेत.