Next
पुण्यात अनुवाद लेखन कार्यशाळेचे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, December 11, 2018 | 05:21 PM
15 0 0
Share this story

पुणे : साहित्य सेतू व महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) यांच्या वतीने ‘अनुवाद कसा करावा?’ ही लेखन कार्यशाळा  १६ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. सदाशिव पेठेतील एमईएस ऑप्टिमेट्री कॉलेज येथे ही कार्यशाळा होईल.

या कार्यशाळेत वर्षा गजेंद्रगडकर, उमा कुलकर्णी, चंद्रकांत भोंजाळ, भारती पांडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तंत्रज्ञानामुळे भारतीय तसेच जगभरातील उत्तमोत्तम पुस्तके वाचकांना लगेचच उपलब्ध होत असली तरीही मातृभाषेतून मिळणारा साहित्यिक आनंद व ज्ञान तितकेसे वाचकांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे जगभरातील उत्तमोत्तम साहित्य आपल्याला मातृभाषेत वाचायला मिळावे अथवा आपल्या भाषेतील साहित्य व ज्ञान जगभरातील वाचकांपर्यंत पोहचावे यासाठी स्वतंत्र लेखकांइतकिच अनुवादकांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

जगभरातील साहित्याच्या व ज्ञानाच्या देवाणघेवाणीमध्ये अनुवाद म्हणजे केवळ शब्दशः भाषांतर न राहता त्याला आपल्याच मातृभाषेतील एक स्वतंत्र निर्मिती वाटेल व मूळ संहितेला धक्का न लावता आपल्या मातृभाषेतील मूळ  लिखाणाएवढी ताकदीची व आत्मीय वाटणाऱ्या साहित्याची अनुवादनाद्वारे निर्मिती करणाऱ्या अनुवादकांची गरज निर्माण झाली आहे.

भारतासह जगभरातील प्रकाशकांनीदेखील साहित्याच्या अनुवादित प्रकाशनासाठी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला असून, त्यामुळे, उत्तम अनुवादकांसाठी व्यावसायिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. साहित्य क्षेत्राबरोबरच जगभरातील टेलिकॉम, इलेक्ट्रॉनिक्स व इतर औद्योगिक क्षेत्रातील कॉर्पोरेट कंपन्या, या ज्या त्या देशामधील, राज्यांमधील स्थानिकांपर्यंत आपल्या वस्तू व सेवा पोहचविण्यासाठी अनुवादकांची मोठ्या प्रमाणावर मदत घेत आहेत.

याच संकल्पनेतून मराठीतही उत्तमोत्तम अनुवादक घडावेत व व्यावसायिकरित्या अनुवादित साहित्याची निर्मिती करावी हा हेतूने अनुवाद कसा करावा या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत अनुवाद म्हणजे काय, अनुवाद कसा करायचा, अनुवाद क्षेत्रातील देशांतर्गत संधी, अनुवाद क्षेत्रातील विदेशातील संधी, मराठीतून इतर भारतीय व जागतिक भाषांमध्ये व इतर भाषांमधून मराठीमध्ये अनुवाद, उत्तम अनुवादकासाठीची साहित्यिक आणि भाषिक कौशल्ये, अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी, यशस्वी अनुवाद- तंत्र आणि मंत्र, अनुवाद- एक उत्तम करिअर संधी, अनुवाद- आयटी, बीपीओ आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील संधी या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

कार्यशाळेविषयी :
दिवस :
१६ डिसेंबर २०१८
वेळ : सकाळी १० ते ५.३०
स्थळ : एमईएस ऑप्टिमेट्री कॉलेज, पहिला मजला, पेरूगेट भावे हायस्कूल आवार, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०
माहितीसाठी संपर्क : ७०६६२ ५१२६२, ७५०७२ ०७६४५
संपर्कासाठी पत्ता : साहित्य सेतू, ६२२, जानकी रघुनाथ, पुलाचीवाडी, झेड ब्रिजजवळ, डेक्कन जिमखाना, पुणे- ०४
ऑनलाइन नोंदणीसाठी : www.sahityasetu.org/karyshala
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link