Next
‘कान’ महोत्सवात भारतीय दिग्दर्शकाचा सन्मान
महाराष्ट्रातील ‘सीड मदर’ राहीबाई पोपेरे यांच्यावरील लघुपटाने पटकावला पुरस्कार
BOI
Monday, May 20, 2019 | 05:41 PM
15 0 0
Share this article:

अच्युतानंद द्विवेदी आणि राहीबाई पोपेरे

मुंबई : यंदाचा ७२वा ‘कान महोत्सव’ भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी निराशाजनक ठरला असला, तरी अच्युतानंद द्विवेदी या भारतीय दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या तीन मिनिटांच्या ‘सीड मदर’ या लघुपटाला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे भारतीयांची मान उंचावली आहे.  

कान महोत्सवाच्या ‘नेसप्रेसो टॅलेन्ट्स २०१९’ या विभागात त्यांनी हा पुरस्कार मिळवला आहे. ‘सीड मदर’ ही तीन मिनिटांची, महाराष्ट्रातील राहीबाई सोमा पोपेरे या एका महिलेची कहाणी आहे. स्थानिक महिलांच्या मदतीने देशी बियाणांची बँक चालवणाऱ्या राहीबाईंनी महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये पारंपरिक शेतीचा विकास करण्याचे कार्य केले आहे. ‘कान’ समीक्षक सप्ताहात दर वर्षी ‘इंटरनॅशनल सेक्शन ऑफ नेसप्रेसो टॅलेंट’चे आयोजन केले जाते. त्यामध्ये ‘वी आर व्हॉट वी इट’ अशी या विभागाची यंदाची थीम होती. जगातील विविधता, जगाचे अन्वेषन, विविध ठिकाणचे अनुभव, ज्ञान या सगळ्या गोष्टी खाण्यामधून विशद करायच्या होत्या. दाखवायच्या होत्या. यासाठी जगभरातील विविध ठिकाणचे खाद्य धोरण, जैवविविधता, शेती प्रकार, विविध संस्कृतींमधील लोकप्रिय खाद्यपदार्थ यांच्यावरील व्हिडिओ मागवण्यात आले होते. त्यानुसार ४७ देशांमधून सुमारे ३७१ व्हिडिओज आले होते. 

दिग्दर्शक-निर्माते अच्युतानंद द्विवेदी हे मुळचे मुंबईचे असून दीर्घ काळ मुंबईत वास्तव्य केलेले आहेत. मात्र सध्या ते पुद्दुचेरी याठिकाणी राहतात. एकदा किचन गार्डनसाठी अच्युतानंद यांना बियाणांची गरज होती, तेव्हा त्यांना कोणीतरी राहीबाईंचे नाव सुचवले होते. ‘मुंबईतील जगण्याचा वेग प्रचंड असून तो मला संपवण्याच्या मार्गावर आहे, असे मला वाटू लागले आणि मी मुंबईच्या बाहेर पडलो. घराच्या किचन गार्डनसाठी बियाणे पाहत असताना राहीबाईंचा संदर्भ मिळाला’, अशी माहिती अच्युतानंद यांनी दिली. 

या आधी २०१६मध्ये अच्युतानंद यांना मुंबईतील मार्शल आर्ट्स फायटर फरहान सिद्दिकी यांच्यावरील ‘इंटरनल फाइट’ या ९० सेकंदांच्या लघुपटासाठी पुरस्कार मिळाला होता. 

महाराष्ट्रातील ‘सीड मदर’ राहीबाई पोपेरे यांच्या कार्याची माहिती देणारे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील विशेष वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search