Next
‘आयसीआयसीआय’ची अपग्रेडेड ‘ट्रेड ऑनलाइन’ सुविधा
प्रेस रिलीज
Wednesday, December 19, 2018 | 05:56 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आयसीआयसीआय बँकेने विविध प्रकारच्या नव्या डिजिटल सेवांचा समावेश करून, निर्यात-आयात व्यवहारांसाठी आपल्या ‘ट्रेड ऑनलाइन’ सुविधेमध्ये बदल केले असल्याचे जाहीर केले. यातील बहुतांश सेवा या क्षेत्रातील विशेष सेवा आहेत.

‘ट्रेड ऑनलाइन’चे रूपांतर डिजिटल बँकिंग सुविधेमध्ये झाले असून, त्यामुळे मोठ्या, मध्यम व लहान आकाराच्या कंपन्यांना आणि एमएसएमईंना त्यांचे निर्यात-आयातविषयक व्यवहार ऑनलाइन करणे शक्य होणार असून, भौतिक स्वरूपातील डॉक्युमेंटेशनची आवश्यकता भासणार नाही. व्यापारविषयक व्यवहार सुरू करण्यासाठी आता बँकेच्या शाखेत जायची आवश्यकता नसल्याने, ग्राहकांसाठी ही सुविधा अतिशय सोयीस्कर आहे. ग्राहकांना हे व्यवहार आता केव्हाही, कोठूनही सुरक्षित पद्धतीने करता येऊ शकणार आहेत.

‘ट्रेड ऑनलाइन’द्वारे सुरू करता व राबवता येण्यासारख्या सेवांमध्ये लेटर्स-ऑफ-क्रेडिट (एलसी) व बँक गॅरंटी देणे, निर्यात-आयात कलेक्शन बिले, एक्स्पोर्ट क्रेडिटचे वितरण, आयातीचे पेमेंट अशा सेवांचा समावेश आहे. त्यामध्ये, सॉफ्टवेअर उद्योगासाठी ‘ई-सॉफ्टेक्स’सारख्या व मोठ्या निर्यातकांसाठी ई-एलसी सुविधासारख्या विशेष सेवाही समाविष्ट आहेत. याबरोबरच, रेमिटन्स स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या आयसीआयसीआय बँक करंट अकाउंटमध्ये अवघ्या काही मिनिटांमध्ये इनवर्ड रेमिटन्स जमा करण्याची झटपट व सोयीस्कर सेवा देणारी ही पहिली डिजिटल बँकिंग सुविधा आहे.

त्याचप्रमाणे ट्रेड ऑनलाइन ही सुविधा आता नियमनात्मक इम्पोर्ट डाटा प्रोसेसिंग अँड मॉनिटरिंग सिस्टीम (आयडीपीएमएस) व एक्स्पोर्ट डाटा प्रोसेसिंग अँड मॉनिटरिंग सिस्टीम (ईडीपीएमएस) यामध्ये एकात्मक करण्यात आली आहे. या एकात्मिकरणामुळे निर्यातक-आयातक यांना ‘ईडीपीएमएस’, ‘आयडीपीएमएस’ यावरील बाकी असणाऱ्या एंट्रींच्या अनुषंगाने, बिलांची एंट्री करण्याची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने सुरळीत करता येईल. विविध प्रकारच्या डिजिटायझेशन वैशिष्ट्यांचा समावेश असणाऱ्या, आयसीआयसीआय बँकेच्या ‘ट्रेड ऑनलाइन’ची नवी आवृत्ती ही व्यापारविषयक व्यवहारांसाठी एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या सेवा देणारी एकमेव डिजिटल बँकिंग सुविधा आहे.

आयसीआयसीआय बँकेचे कमर्शिअल बँकिंग ग्रुपचे प्रमुख अजय गुप्ता म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँकेमध्ये आम्ही ग्राहकांना जागतिक दर्जाच्या, या क्षेत्रातील आघाडीच्या व अत्याधुनिक सेवा व अनुभव देण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यावर कटाक्षाने भर देतो. व्यापारविषयक व्यवहारांना असलेल्या डिजिटायझेशनच्या गरजांबाबत दीर्घ व सखोल संशोधन केल्यावर पूर्णतः नवी ‘ट्रेड ऑनलाइन’ सुविधा साकारण्यात आली आहे. सर्व बँकांमध्ये उपलब्ध असणारी ही सर्वात सर्वंकष डिजिटल सुविधा आहे, असे आहाला वाटते. ही सुविधा कॉर्पोरेट व उद्योजकांना व्यापाराशी संबंधित जवळजवळ सगळे व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्याची सोय देते. आयात-निर्यात यासंबंधी व्यवहार, रेमिटन्स, क्रॉस बॉर्डर बिले, एलसी, बँक गॅरंटी यासाठी शाखेत जाण्याची आवश्यकता भासत नाही. या सुविधेमुळे, संपूर्ण निर्यात-आयात उद्योगातील ग्राहकांना चालना मिळणार आहे आणि उद्योग करण्याच्या बाबतीत जागतिक स्तरावर सुलभता येणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search