Next
माहेश्वरी समाजातर्फे पाच दिवसीय होळी महोत्सव
प्रेस रिलीज
Saturday, March 23, 2019 | 03:38 PM
15 0 0
Share this article:


पुणे : होळीनिमित्त माहेश्वरी समाजातर्फे दर वर्षीप्रमाणे याही वर्षी पाच दिवसीय होळी महोत्सवाचे आयोजन केले असून, उत्सवाची सुरुवात रविवार पेठेतील कापडगंज येथील लक्ष्मीनारायण मंदिर व श्रीराम मंदिरात झाली.

मंदिराबाहेर होळी पेटवून राजस्थानी समाजाचे ‘घेरीया’ यांनी पेटत्या होळीच्या भवती फेर धरत चंग हे पारंपरिक वाद्य वाजवीत लोकगीते सादर केली. नंतर मंदिरात ढूंढ केली. ढुंढा राक्षसीणने प्रल्हादला जाळण्यासाठी प्रल्हादला कडेवर घेऊन अग्नित प्रवेश केला; पण प्रल्हाद बचावला आणि ढुंढा जळून खाक झाली. चंग वाद्याच्या आवाजामुळे ढुंढा ही मुलांच्या आसपास फिरकत नाही, असा समज असल्याने चंग वाजवीत मंदिरामध्ये वर्षाच्या आतील मुला-मुलींची ‘ढुंढ’ केली जाते. सारे समाजबांधव या उत्सवात पारंपरिक पोशाख परिधान करून सहभागी झाले होते. भाविकांच्या गर्दीने फुललेल्या मंदिरात नैसर्गिक रंगांची उधळण करत व पेढ्यांच्या प्रसादाचे वाटप या वेळी करण्यात आले, अशी माहिती सत्येंद्र राठी यांनी दिली.

रविवार पेठेत वसाहत असलेला माहेश्वरी समाज कालौघात पुण्यात विविध ठिकाणी विखुरला गेला. त्यानंतर पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीचे आदान-प्रदान व्हावे, आणि एकमेकांशी असलेले ऋणानुबंध पुन्हा घट्ट व्हावेत यासाठी वेळोवेळी सगळ्यांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत पुढे आले. माहेश्वरी समाजाचे नंदकिशोर राठी यांनी समाजातील सर्व कुटुंबीयांनी होळी ते रंगपंचमी या पाच दिवसांत रोज संध्याकाळी एकत्र येण्याइ संकल्पना मांडली आणि त्याला सर्वांनी दुजोरा दिला.

त्यानुसार पहिल्या दिवशी मंदिर व तीन दिवस कोणाही समाज सदस्याकडे सदिच्छा भेटीसाठी एकत्र येणे सुरू झाले. या पाच दिवसांच्या महोत्सवात सहभागी झालेल्यांना अल्पोपाहार व थंडाई दिली जाते. या पाच दिवसांत एका सायंकाळी ‘सांस्कृतिक संध्याची’ आखणी असते. यात हिंदी हास्यकवी, कलाकार संगीत, गायनाने रंग भरतात. या मैफलीत मराठी कलाकारही सहभागी होतात. रामदास फुटाणे, दीपक देशपांडे, शरद उपाध्ये, विसूभाऊ बापट, अशोक नायगांवकर यांसारखे कलाकारांनी या महोत्सवात आपली कला सादर केली आहे.‘या पाच दिवसीय महोत्सवाचा समारोप रंगपंचमीला वन भोजनाने केला जातो. या प्रसंगी समाज अभिसरणासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान केला जातो. हास्य विनोद, चिमटे, कोपरखळ्या, खेळ, रंग, शेले पागोटे आदीने हा वनभोजन गाजतो. हा उपक्रम गेली २८ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे,’ अशी माहिती राठी यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sunil Hemraj Mundada About 94 Days ago
Very good
0
0

Select Language
Share Link
 
Search