Next
अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात होणार ‘सीताफळ हब’
कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची माहिती
BOI
Wednesday, July 10, 2019 | 06:08 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘शास्त्रोक्त पद्धतीने सीताफळाची लागवड, संगोपन, प्रक्रिया, तसेच विपणन व्यवस्थेचा विकास करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात खेड (ता. मोर्शी) आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सीताफळ हब विकसित करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करावी,’ अशा सूचना कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिल्या.

सीताफळाच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने डॉ. बोंडे  यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीला कृषी विभागाचे सहसचिव अशोक आत्राम, कृषी सहसंचालक (फलोत्पादन) शिरीष जमदाडे, संशोधन संचालक व्ही. के. खर्चे, सीताफळ महासंघाचे सचिव अनिल रा. बोंडे, अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अ. म. इंगळे, फलोत्पादन उपसंचालक सु. वि. भालेराव आदी उपस्थित होते.


डॉ. बोंडे म्हणाले, ‘सीताफळ हे पीक विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणू शकते. सीताफळाची रोपे व झाडांना वन्यप्राणी खात नसल्याने इतर पिकांच्या तुलनेत याची लागवड फायदेशीर ठरू शकते. अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या जातींची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.’

‘विदर्भात सीताफळ हब निर्माण करून शास्त्रोक्त पद्धतीने सीताफळ लागवड, फळांची साठवणूक, गर काढणे, त्यावर प्रक्रिया, रोपवाटिका विकास, ठिबक सिंचन पद्धती, विपणन व्यवस्थेचा विकास करण्याचे नियोजन करण्यात येईल. त्यासाठी कृषी विभागाने तात्काळ प्रस्ताव सादर करावा. सीताफळ लागवड अनुदानाबाबतचे पॅकेज निश्चित करण्यासाठी कृषी विद्यापीठाची मदत घ्यावी,’ असे डॉ. आवाहनही बोंडे यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 67 Days ago
Laudable intention . Practical steps ? Perhaps , this is only PR exercise .
0
0

Select Language
Share Link
 
Search