Next
‘मोबिक्विक’ ‘बूस्ट’द्वारे ९० सेकंदांत त्वरित कर्ज
प्रेस रिलीज
Wednesday, October 03, 2018 | 04:40 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : भारतातील सर्वांत मोठ्या डिजिटल वित्तीय सेवा मंच असलेल्या ‘मोबिक्विक’ने ‘बूस्ट’ या आपल्या महत्त्वपूर्ण उत्पादनाच्या आरंभाची घोषणा केली आहे. या उत्पादनाद्वारे ‘मोबिक्विक’ युजरना त्वरित कर्ज मंजुरी देऊन त्याचे वितरण केले जाणार आहे. अशा प्रकारचे हे पहिले क्रेडिट वितरण उत्पादन असून, यात ६० हजारपर्यंतची कर्जे मंजूर होऊन केवळ ९० सेकंदांत वितरित केली जाणार आहेत. यासाठी ‘मोबिक्विक’ने अनेक एनबीएफसीसोबत भागीदारी केली आहे. ‘मोबिक्विक’ हे युजरच्या मोबाइल वॉलेटमध्ये कर्जाची रक्कम वितरित करणारे पहिले वॉलेट आहे.

‘बूस्ट’तर्फे कागदरहित किंवा तारणरहित कर्जे दिली जाणार आहेत. कर्ज मंजुरीचा निर्णय हा ‘मोबिक्विक’द्वारे विकसित केलेल्या ‘मोबिस्कोर’ नावाच्या नवीनतम जोखीम गुणांकन मॉडेलच्या आधारावर ३० सेकंदांच्या आत घेतला जाईल. संपूर्ण कर्ज प्रवासामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डाटा विश्लेषण क्षमतांमुळेच वास्तविक वेळ हमीदान शक्य आहे.

यूजर मोबिक्विक अ‍ॅपद्वारे पाच हजार ते ६० हजार रुपयांपर्यंत या श्रेणीमधील कर्जांसाठी आवेदन करू शकतात. अ‍ॅपद्वारे कर्ज मिळवणार्‍या ‘मोबिक्विक’ युजरकडे त्यांची कर्जाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. जमा झालेली रक्कम अ‍ॅप यूजर त्वरित खरेदी, लग्न खर्च, प्रवास योजना, हॉटेल बुकिंग, वैद्यकीय आपत्काळ तसेच ऑफलाइन आणि ऑनलाइन व्यापारी देयक अशा विविध कारणांसाठी वापरू शकतात.

कर्जाच्या प्रक्रियेमध्ये चार सोप्या पायऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वप्रथम ‘मोबिक्विक अ‍ॅप’वर ‘बूस्ट’ निवडायचे आहे. त्यानंतर त्वरित कर्जासाठी ‘बूस्ट’ सक्रिय करायचे आहे. कर्जाची ऑफर पाहण्यासाठी पॅन आणि इतर केवायसी तपशील दिल्यानंतर कर्जाची ऑफर स्विकारून त्वरित वितरण मिळवायचे आहे.  

या घोषणेविषयी बोलताना ‘मोबिक्विक’च्या सह संस्थापक आणि संचालक उपासना टाकू म्हणाल्या, ‘प्रत्येक भारतीयाला तो कुठे राहतो हे लक्षात न घेता सहज क्रेडिट मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. हे अशाप्रकारचे पहिले उत्पादन आहे, जे भारतात मिळत असलेल्या क्रेडिट पद्धतीमध्ये क्रांतिकारी बदल करत आहे. आमचे क्रांतिकारी उत्पादन भारतामध्ये कुठेही राहत असलेल्या भारतीयांना, मोबिक्विक अ‍ॅपद्वारे ९० सेकंदांच्या आत जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा त्वरित कर्ज मिळवून देऊ शकते. या ऑफरची सुरुवात करताना सुरुवातीच्या महिन्यांमध्ये आम्ही आधीच १०० हजार कर्ज प्रदात्यांची संख्या पार केली आहे. आम्ही ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण क्रेडिट गरजा भागवण्यासाठी कर्ज पोर्टफोलिओमध्ये नवीन ग्राहकांची नोंदणी करत आहोत. देशामधील डिजिटल वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये कर्ज देणे हे गेम चेंजर ठरेल आणि आम्हाला अग्रणी म्हणून स्थापित करेल याचा आम्हाला विश्वास आहे.’

कर्जाची रक्कम ही सहा आणि नऊ महिन्यांच्या सोप्या हप्त्यांमध्ये देय असेल. ही रक्कम कर्जदार ‘मोबिक्विक अ‍ॅप’मधून पेबॅक करू शकतात किंवा त्यांच्या बॅंक खात्यामधून मासिक ईएमआयचे स्वयं-डेबिट करण्यास ‘मोबिक्विक’च्या भागीदाराला सक्षम करू शकतात. ‘मोबिक्विक’ युजरना कर्जाचा लाभ मिळवण्यासाठी पॅन कार्ड आणि इतर केवायसी तपशीलासह त्यांचा केवायसी अद्ययावत करणे आवश्यक आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search