Next
‘डीकेटीई’च्या माजी विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय संमेलन
प्रेस रिलीज
Monday, December 31, 2018 | 06:06 PM
15 0 0
Share this story

बांगलादेशमधील ढाका येथे डीकेटीईच्या माजी विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलनात डीकेटीईचे डायरेक्टर डॉ.  पी. व्ही. कडोले, डॉ यु. जे. पाटील, प्रा. एस. बी. अकिवाटे यांच्यासमवेत माजी विद्यार्थी.

इचलकरंजी : बांगलादेश येथे डीकेटीईच्या माजी विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. डीकेटीईचे डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले व त्यांचे प्रतिनिधी बांगलादेश येथे विविध इंडस्ट्रीज, विविध विद्यापीठाच्या निमंत्रणामुळे गेले होते. याचे औचित्य साधून तेथील नॉइज जीन्स कंपनीचे मालक व डीकेटीईचा माजी विद्यार्थी मनीष चव्हाण यांच्या पुढाकाराने ‘डीकेटीई’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा बांगलादेश येथे झाला.

या मेळाव्याला ४० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे बांगलादेश येथे डीकेटीईच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. १९८७ पासून डीकेटीईचे माजी विद्यार्थी देश व विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. ७००हून अधिक विद्यार्थी परदेशात वास्तव्यास आहे. जागतिक पातळीवर वस्त्रोद्योग केंद्र म्हणून बांगलादेश उदयास येत आहे. त्याच्या उभारणीमध्ये डीकेटीईच्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. बरेच माजी विद्यार्थी टेक्स्टाइल उद्योजक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या २० वर्षापासून हे विद्यार्थी परदेशामध्ये उत्तम कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत.

डीकेटीईचे डायरेक्टर डॉ. कडोले यांनी डीकेटीईच्या कार्याचा आढावा घेत, माजी विद्यार्थ्यांचे महत्त्व विषद केले. त्यांनी डीकेटीईस एनबीए, नॅक ए प्लस दर्जा व नुकताच एआयसीटीईकडून झालेला गौरव नमूद करताना यासाठी मिळालेले माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य याचा आवर्जून उल्लेख केला. डीकेटीईचे उपसंचालक डॉ. यु. जे. पाटील यांनी डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी नोकरीबरोबर उद्योजक होण्यास प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. प्रा. एस. बी. अकिवाटे यांनी सातत्याने १०० टक्के टेक्स्टाइल प्लेसमेंटबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमानंतर झालेल्या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व विचारांची देवाणघेवाण केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link