Next
पुण्यात फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण
प्रेस रिलीज
Monday, September 17, 2018 | 03:40 PM
15 0 0
Share this storyपुणे : गणेशोत्सवाच्या काळात पोलीस कर्मचारी, ढोल ताशा पथकातील वादक, कार्यकर्त्यांना त्रास झाल्यास त्यांच्या सेवेसाठी खास मोफत नामदार फिरता दवाखाना १५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आला. या दवाखान्याचे लोकार्पण पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.   

हा कार्यक्रम प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अनिल बेलकर व केतन शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कसबा गणपती मंदिराजवळ शनिवारी (१५ सप्टेंबर) आयोजित केला होता. या उपक्रमाची संकल्पना बेलकर, शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आहे. ही सेवा गणेशोत्सवाच्या काळात २४ तास चालू राहणार आहे. एक रुग्णवाहिका डॉक्टर, परिचारिका, औषधोपचार आदीं सुविधांसह सुसज्ज करण्यात आली आहे. त्यासोबत दोन दुचाकी वाहने गर्दीच्या ठिकाणी रुग्णांना ने-आण करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.
 
या प्रसंगी राज्यमंत्री महादेव जानकर, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, नगरसेवक राजेश येनपुरे, वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. तेजस्वी सातपुते, नगरसेविका गायत्री खडके, अजय खेडेकर, माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी, दीपक पोटे, पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे, क्षेत्रिय अधिकारी आशिष म्हादळकर, महेंद्र पितळीया, डॉ. चंद्रकांत परुळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link