Next
सम्राट अशोक चरित्र
BOI
Tuesday, June 05 | 10:13 AM
15 0 0
Share this story

सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी भारतात आपले आधिपत्य निर्माण करून इतिहास अजरामर झालेला सम्राट अशोक हा राजा होऊन गेला. त्याने फक्त राज्यच केले असे नाही, तर त्याने जनतेला धर्मज्ञान, सदाचार, भूतदया या गुणांची शिकवण दिली. प्रजेने या तत्त्वांवर चालावे अशी आशा त्याने केली आणि तसा प्रयत्न आयुष्भर केला. अशा या महान राजासंदर्भात आपल्याला फारशी माहिती नाही. अनेक संशोधकांनी सम्राट अशोकाच्या कारकीर्दीवर संशोधन केले. त्यातून आपल्याला अनेक संदर्भ मिळत गेले आहेत आणि आजही मिळत आहेत.

सम्राट अशोक चरित्र या पुस्तकात वा. गो. आपटे यांनी अशोकाविषयी उपलब्ध असणारी समग्र माहिती मिळते. आपटे यांनी हे चरित्र लिहून ७५ वर्ष झाली. त्यानंतर या विषयावर कोणतेही पुस्तक प्रसिद्ध झालेले नाही. त्यामुळे मधल्या काळात सम्राट अशोकाविषयी झालेल्या संशोधनाची माहिती घेऊन प्र. रा. अहिरराव यांनी या सम्राट अशोक चरित्र या पुस्तकाचा विस्तार केला आहे. अनेक नवीन विषय, छायाचित्र, अशोकाच्या शिल्पांचे संपादन या पुनर्लिखित पुस्तकात वाचायला मिळतील.

प्रकाशक : वरदा प्रकाशन
पाने : २४०
किंमत : २५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link