Next
पुण्याचे सांस्कृतिक दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शन
आयआयआयडी आणि अर्बन स्केचर्स ग्रुपचा उपक्रम
BOI
Monday, March 18, 2019 | 06:04 PM
15 0 0
Share this article:

‘आर्ट मॅटर्स’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी (डावीकडून) मानसी रिसालदार, श्रुती उटगीकर,परिमल चौधरी आणि अलका रोडे.

पुणे : स्केचेस आणि पेंटिंग्जच्या माध्यमातून पुण्याचा वारसा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारे ‘आर्ट मॅटर्स’ हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील आयआयआयडी एज्युकेशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी, २३ मार्च २०१९ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरिअर डिझाईनर अर्थात आयआयआयडी आणि अर्बन स्केचर्स (युएसपी) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच प्राज फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त परिमल चौधरी यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात वास्तुविशारद श्रुती उटगीकर, मानसी रिसालदार आणि अलका रोडे यांनी रेखाटलेली पुण्याची समृद्ध संस्कृती आणि वारसा या विषयावरील स्केचेस आणि पेंटिंग्ज पाहता येणार आहेत. 

कलाकारांच्या वतीने बोलताना श्रुती उटगीकर म्हणाल्या, ‘पुण्यातील विविध लोकेशन्सवर जाऊन स्केचिंग करताना पुण्याकडे बघण्याचा वेगळाच अनुभव येतो. एकाच ठिकाणाचे वेगवेगळे पैलू दृष्टीस येतात. प्रत्येक कलाकाराला तिथली वेगळी वैशिष्ट्ये भावतात. निर्मितीचा आनंद अनुभवता येतो. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्हीही हा अनुभव घेतला.

या वेळी परिमल चौधरी म्हणाल्या, ‘आज आपण जगत असलेल्या स्पर्धात्मक जगात कला खूप महत्त्वाची आहे. अशा पद्धतीच्या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण उदयोन्मुख कलाकारांना एका हक्काच्या व्यासपीठाबरोबरच प्रोत्साहन देत आहोत याचा मला आनंद आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणे शहराचे अनेक पैलू स्केचेस आणि पेंटिंग्जद्वारे समोर आले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search